दौंड शहरात पेट्रोल डिझेल,गॅस दरवाढबाबत केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली


दौंड शहरात पेट्रोल डिझेल,गॅस दरवाढबाबत केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पेट्रोल ने शंभरी पार केली डिझेल 100 च्या घरात आले,घरगुती गॅस 30 रुपयांनी महागला या सर्वांची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे,याबाबत केंद्र सरकार विरोधात दौंड शहरात सायकल रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला,वाढती महागाई, पेट्रोल, डीजल,गॅस,CNG, कडधान्य, तेल सर्वच वस्तूंचे  दरवाढी विरोधात सायकल रॅली आयोजित करून केंद्र सरकारचा जाहिर दौंड मधून निषेध करण्यात आला. छत्रपति शिवाजी महाराज चौकातून सायकल रैली ची सुरवात करून रिलायंस पेट्रोल पंपावर शेवट करण्यात आला. सदर प्रसंगी दौंड तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे, तालुका महासचिव प्रकाश सोनवणे , शहराध्यक्ष हरेष ओझा, शहर उपाध्यक्ष महेश जगदाळे, युवक तालुकाध्यक्ष अतुल जगदाळे, पर्यावरण कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तन्मय पवार, तालुका उपाध्यक्ष बापु बारवकर, विठ्ठल शिपलकर, रज्जाक शेख, रमेश शिंदे,अतुल थोरात, ऋषीकेश वागसकर,आमीत थोरात, इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर रैली चे आयोजन दौंड शहर कॉंग्रेस कमिटी व तालुका युवक कॉंग्रेस कमिटी च्या सहयोगाने करण्यात आले असल्याची माहिती प्रकाश सोनवणे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News