सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटलचे अधिक्षक डाॅ. सदानंद काळे व राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित


सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटलचे अधिक्षक डाॅ. सदानंद काळे व राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) अजितदादा युथ फौंडेशनच्या वतीने कोरोना काळातील गरज ओळखून दि.१६ जुलै रोजी उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व कोविडमध्ये उल्लेखनीय कामाची दखल घेत कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.

   सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटलचे अधिक्षक डाॅ. सदानंद काळे व राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना कोविड योद्धा पुरस्काराने आमदार निलेशभाऊ लंके यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा आमदार निलेशभाऊ लंके यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या होत्या. 

    यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, महिला अध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतदादा गावडे, दुध संघाचे माजी व्हाईस चेअरमन प्रताप पागळे, भारत मोकाशी, अभिजीत काळे, आयोजक सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. 

       गेल्या एक वर्षापासुन कोरोनामध्ये केलेल्या कामाची दखल घेत अजितदादा युथ फौंडेशन बारामती यांनी मला कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर व नटराज संचलित कोविड केअर सेंटरमुळे मला काम करण्याची संधी मिळाली व काम करता आले... किशोर मासाळ.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News