चोपडजला स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण


चोपडजला स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील चोपडज याठिकाणी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायत चोपडज यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर व पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे यांच्या हस्ते करण्यात आला.

 एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या संकल्पनेतून बारामती शहर व तालुक्यात एक लाख झाडे लावण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम तसेच झाडे लावल्यानंतर त्याची देखभाल व संगोपन करून वरचेवर लक्ष देणार असल्याची माहिती यावेळी फोरमच्यावतीने ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितली. 

   या कार्यक्रमास बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक अमर धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उद्योजक प्रवीण जगताप तसेच चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप, ग्रामपंचायत सदस्य, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय गाडेकर, समिर गाडेकर, राजेंद्र गाडेकर, शशिकांत कदम पदाधिकारी, कृषिकन्या, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गाडेकर यांनी तर आभार उपसरपंच तुकाराम भंडलकर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News