रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल...


रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल...

अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि कंपनी अधिकाऱ्यास धरले वेठीस

शिरूर  | प्रतिनिधी( अप्पासाहेब ढवळे )

           सणसवाडी( ता.शिरूर,जि. पुणे )येथील रस्त्यावर असलेल्या अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि कंपनी अधिकाऱ्यास कंपनीत कॉन्ट्रॅक्ट दे अन्यथा महिन्याला खंडणी दे नाही तर  जीवे मारीन असे म्हणून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चार जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे


       शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संदीप मारूती पाटील, (वय 47 वर्ष, व्यवसाय – नोकरी )अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि.पुणे.यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादी वरून सदर प्रकरणतील वैभव संभाजी आदक (रा.अष्टापुर ता.हवेली जि.पुणे.हल्ली रा.शिक्रापुर ता.शिरूर जि.पुणे), अनिकेत पोपट ढोकले, आनंद पंडीत कसबे (दोघे रा.करंदी ता.शिरूर जि.पुणे), संदेश कोतवाल (रा.अष्टापुर ता.हवेली जि.पुणे) यांच्यावरच शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

         याबाबत शिक्रापूर पोलिसांना देण्यात आलेली, माहिती या प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून फिर्यादीयास दि. 21/02/2021 पासुन दि. 28/6/2021 रोजी 07/30 वााजण्याचया सुमारास अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि.कंपनीत कॉन्ट्रॅक्ट दे किंवा महिन्याला खंडणी दे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण व शिवीगाळ केली तसेच वेळोवेळी पाटलाग करून गाडी आडवी लावून पिस्तुलाचा धाक दाखवून आपल्या साथीदारांसह शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली. असता शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडणी, मारहाण दमदाटी , आर्म अँक्ट 3 , 4 , 25 क्रीमीनल अँक्ट कलम 7 प्रमाणे, गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर भालेकर करीत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News