भारती विद्यापीठ व्यापारी असो. चे अध्यक्ष पंढरीनाथ खोपडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व मास्क वाटपाने साजरा


भारती विद्यापीठ व्यापारी असो. चे अध्यक्ष पंढरीनाथ खोपडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व मास्क वाटपाने साजरा

मिलिंद शेंडगे (विशेष प्रतिनिधी)पुणे : येथील भारती विद्यापीठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ नामदेव खोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण समारंभ व मास्क वाटप करण्यात आले. वृक्षरोपण केल्यानंतर त्या झाडाचे संगोपन करून एक वर्षानी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. झाड पूर्ण मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन केले जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

       या कार्यक्रमावेळी उपस्थित प.पू.सद्गुरू योगी भगवान नाथ महाराज, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, प्रकाश पासलकर, पोलिस निरीक्षक,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, युवराज बेलदरे नगरसेवक, राजू दुल्लम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मनपा पुणे, प्रमोद ढसाळ, आरोग्य निरीक्षक मनपा पुणे, प्रकाश नाना खोपडे, बाळासाहेब ताकवले यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला भारती विद्यापीठ व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. विक्रांत सिंह यांनी सूत्रसंचालन केले तसेच पंढरीनाथ खोपडे यांनी सर्वांचे आभार मानले. झाडे लावा झाडे जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या हाच संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News