जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून प्रभूवाडगाव ते गदेवाडी रस्ता तहसीलदार शेवगांव यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढुन केला मोकळा


जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून प्रभूवाडगाव ते गदेवाडी रस्ता तहसीलदार शेवगांव यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढुन केला मोकळा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

शेवगांव तालुक्यातील प्रभूवाडगाव गावापासून नागरे वस्ती दोन ते अडीच किमी अंतरावर आहे. सदरच्या रस्त्यावर नागरे वस्ती, खेडकर वस्ती, हरिजन वस्ती असे मिळून जवळपास ६० ते ७० कुटुंब राहतात. या कुटुंबांना गावात येण्या-जाण्यासाठी प्रभूवाडगाव ते गदेवाडी हाच एकमेव रस्ता आहे. गावातील ८० % लोकांच्या जमिनी देखील याच रस्त्यावर असल्याने शेतकऱ्यांना देखील याच रस्त्याने ये – जा करावे लागत होते . जास्तीचा पाऊस आला तर विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी शाळेला दांडी मारावी लागत होती . गावातील एका व्यक्तीने हा रस्ता अडवला असल्याने वेळोवेळी सदरच्या रस्त्यासाठी निधी मिळूनही अद्याप पर्यंत रस्ता झाला नाही.* सदर व्यक्तींना बरेच वेळा ग्रामस्थांनी विनंती केली परंतु ते म्हणतात येथून रस्ता वगैरे काही नाही. तुम्हास आम्ही येथून जाऊ देणार नाही. काय करायचे ते करा असे म्हणून आडमुठेपणाची भूमिका घेतली  होती 

प्रभूवाडगाव ते गदेवाडी या रस्त्याचा प्रधानमंत्री नेटवर्क कव्हरेज मध्ये देखील समावेश आहे. *सदरचा रस्ता हा प्रभूवाडगाव ते नागरे वस्ती १६५ ग्रामीण मार्ग म्हणून देखील ओळखला जातो. पावसाळ्यात सदरच्या रस्त्याला नदीचे स्वरूप तयार होत होते. कोणतीही वाहने या रस्त्याने आणता येत नव्हती . लोकांना रानातून वाट काढत गावामध्ये यावे लागत होते . कित्येकांचे रस्त्याअभावी दवाखान्यात वेळेत न पोहोचल्यामुळे मृत्यू झाले . अनेक महिलांचे देखील या रस्त्यामुळे सीजर करावे लागले आहे. एकंदरीत दळण-वळण पूर्णपणे सदर रस्त्याअभावी ठप्प झाले होते . 

हया सर्व अडचणींनीची दखल  घेऊन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून प्रभूवाडगाव ते गदेवाडी रस्ता तहसीलदार शेवगांव यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढुन केला मोकळा प्रभूवाडगाव ते गदेवाडी हा बंद केलेला रस्ता खुला केला.  लाडजळगाव गटाच्या जी प सदस्या स्वतः आणि शेवगांव तहसीलदार यांना JCB मध्ये बसवून सदरचे अतिक्रमण दुर केले आणि या परिसरातील  रस्त्याअभावी लोकांची होणारी गैरसोय दूर झाली 

शेवगांव तालुक्यात अजूनही बऱ्याच शिव रस्ते आणि शेत रस्त्यामध्ये वडुले दहिफळ भातकुडगाव परिसरात अनेक धन दांडग्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे परिसरातील नागरिकांनी तहसील कडे तक्रारी केल्या आहेत त्यांचा निपटारा होणे अपेक्षित आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News