दक्षच्या सामाजिक कार्यकर्त्या चे उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी गौरव केला


दक्षच्या सामाजिक कार्यकर्त्या चे उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव   यांनी गौरव केला

श्रीगोंदा अंकुश तुपे  प्रतिनिधी:  एका असहाय्य महिलेस तिच्या घरी नेऊन सोडणारे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांचा प्रशस्तिपत्रक देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी  अाण्णासाहेब जाधव यांनी आज गौरव केला.

      दिड वर्षापुर्वी उत्तरप्रदेशातील उतरौला येथील रहात्या घराजवळुन बेपत्ता झालेली महिला राजराणी गणेश मौर्या ही काही दिवसांपुर्वी मांडवगण रोडवर अस्तव्यस्थ अवस्थेत आढळुन आली होती. तिच्यावर ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे डॉ. संघर्ष राजुळे व डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या सुचनेवरुन उपचार केले गेले. तिच्या सर्व तपासण्या केल्या गेल्या. ती सुव्यवस्थित झाल्यानंतर तिच्या पतीबरोबर फोनवरुन संपर्क केल्यानंतर तिच्या घरी सोडण्यात आले. दवाखान्यात ती उपचार घेत असताना दररोज दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, धनेश गुगळे, दिगंबर भदे प्रत्यक्ष जावुन तिच्या तब्बेतीची चौकशी करुन तिला धीर देऊन तिच्या कडुन गावाकडील माहिती घेत होते. तिला अवश्यक असणारे वस्तु देत होते. कधी कधी वैतागुन वैद्यकिय प्रशासनास ती त्रास देत होती त्यावेळी दत्ताजींनी तिला वेळोवेळी समजावुन सांगुन शांत करत होते. 

      दत्ताजी जगताप यांनी प्रवासातील घडलेले प्रसंग व अडचणींचा इतिवृतांत सांगितला. ते ऐकुन उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव सुध्दा गहिवरले. बोलताना जाधव म्हणाले, हा माणुसकीचा सेतु बांधण्याचे कठीण काम दक्षच्या माध्यमातुन आपण करत आहात हे आव्हानात्मक काम आहे. या अशा भानगडीत सर्व सामान्य नागरिक पडत नाहीत. एका महिलेला आपण नेऊन सोडणे हे जिकरीचे काम आपण सहज पार पाडले याबद्दल जाधव यांनी कौतुक केले. सामाजिक हिताच्या कामात पोलीस प्रशासन नेहमी दत्ताजी जगताप व त्यांची दक्षची टिमच्या बरोबर असेल असे ही जाधव म्हणाले.

      याकामी तिकीट काढुन देणारे सोनल हिरणवाळे, बबलु खोसला,मदत करणारे नागरिक, तिला नवे कपडे देणारे,चार चाकीने दौंड स्टेशन पर्यंत सोडणारे दिगंबर भदे, व्यवसायिक, पत्रकार बंधु, प्रशासकिय सहकार्य करणारे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले व उतरौला येथे सहकार्य करणारे प्रभारी पोलीस निरिक्षक पंकज सिंग व संघाचे तसेच विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांचे दत्ताजी जगताप यांनी दक्षची टिमच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले, कर्जतचे पोलीस निरिक्षक यादव, बेलवंडीचे पोलीस उपनिरिक्षक बोरुडे, दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News