सिध्दटेक ग्रामपंचायतला लागलेले टाळे अखेर नऊ दिवसांनी उघडले


सिध्दटेक ग्रामपंचायतला लागलेले टाळे अखेर नऊ दिवसांनी उघडले

ग्रामसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी अडकणार चौकशीच्या फेऱ्यात! 

सिद्धटेक ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकांचा प्रताप, अर्ज आणि ठराव न घेताच विद्यमान सरपंचाची अतिक्रमणात नोंद झाली कशी ? 

सरपंचाचे पती सुजित गायकवाड यांचा अधिकाऱ्यांना सवाल ! मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायत मधील मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची चौकशी सरपंच सौ पल्लवी सुजित गायकवाड यांनी सुरू केल्याने चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी ग्रामपंचायतीचे क्लार्क गणेश खोमणे,शिपाई विश्वनाथ भोसले या कर्मचाऱ्यांनी सरपंच सौ पल्लवी सुजित गायकवाड यांच्या परवानगी शिवाय सोमवार दिनांक ५ जुलै रोजी अनेक महत्त्वाचे रजिस्टर तसेच महत्त्वाचे दस्तावेज कार्यालयाच्या बाहेर लांबविले त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने दप्तर चोरीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनात त्याच दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत आंदोलन केले मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे समजताच गावकऱ्यांनी रात्री ग्रामपंचायत ला कुलूप ठोकून रात्रभर खडा पहारा दिला.


        सरपंच पल्लवी गायकवाड यांच्यासह उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ६ जुलै ला राशीन पोलीस चौकी ला जावून गणेश खोमणे आणि विश्वनाथ भोसले यांनी ग्रामपंचायत मधील अतिक्रमण संदर्भात अनेक फायली,महत्त्वाचे रजिस्टर कार्यालयातून चोरी केल्याची तक्रार देण्यासाठी गेले असता सदरची तक्रार देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याची सबब देवून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली त्यामुळे गट विकास अधिकारी यांना सरपंच सौ.पल्लवी गायकवाड यांनी या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता लेखी तक्रार दिली परंतु चौकशी करून अहवाल देवू अशी भूमिका प्रशासन घेतली.त्याच दिवशी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ग्रामस्थ पदाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या समक्ष गणेश खोमणे आणि विश्वनाथ भोसले या कर्मचाऱ्यांनी सदरचे दप्तर सरपंच सौ पल्लवी गायकवाड आणि ग्रामसेवक विकास हगारे यांच्या पूर्व परवानगी शिवाय ग्रामसेवक अमोल बरबडे यांच्या सांगण्यावरून आणले असल्याचे सांगितले आणि ग्रामसेवक अमोल बरबडे यांनीही आपणच हे दप्तर मागविले होते याची कबुली देवूनही गटविकास अधिकारी यांनी या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यास लेखी पत्र न देता चौकशी चा फार्स सुरू केला त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत चे कामकाज चालू देणार नसल्याचा पवित्रा घेतला.६ जुलै ला चौकशी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी सुद्रीक यांची नेमणूक असल्याने ते सिद्धटेक येथे ८ तारखेला आले आणि चौकशी करण्या ऐवजी दोषी कर्मचाऱ्यांची आणि ग्रामसेवक अमोल बरबडे यांची बाजू घेत प्रकरण मिटवा मिटविची भूमिका घेतली त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने विस्तार अधिकारी सूद्रिक यांनी तेथून पळ काढला.विस्तार अधिकारी सुद्रिक यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून लेखी तक्रार केल्याने सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सिद्धटेक ग्रामपंचायत च्या दप्तर चोरी प्रकरणाची चौकशी करावी असे प्रशासनाने आदेश काढले त्यानुसार १२ जुलै रोजी सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप,विस्तार अधिकारी अटकोरे,विस्तार अधिकारी सुद्रिक यांनी सिद्धटेक येथे येवून केवळ ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप कोणी लावले या संदर्भात सरपंच ग्रामसेवक यांचे जाबजबाब नोंदवून माघारी निघाल्याने ग्रामस्थांनी समिती अध्यक्ष रुपचंद जगताप यांना धारेवर धरले.    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News