गावठी दारू वाहतूक करणारा आरोपी अटक, स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई


गावठी दारू वाहतूक करणारा आरोपी अटक,  स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

 विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड शहरात गावठी दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक,सदर आरोपी हा स्वीप्ट कार च्या डिकीमध्ये ट्यूब मध्ये दारू घेऊन जात असल्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता,परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी

दौंड, भिमनगर, शिरापूर रोड ता.दौंड जि.पुणे येथे स्विप्ट कारसह गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन सुमारे चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

       पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे, दगडू विरकर यांचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना  पथकास शिरापूर-दौंड रोडने एक मारुती स्विप्ट कार नं. एमएच ४२ के ६५८८ ही संशयास्पद रित्या भरधाव वेगाने जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून पुढे भिमनगर दौंड येथे तिस आडवून त्याचा चालक बाळासाहेब अशोक दळवी वय ३७ वर्षे रा.मलटण ता.दौंड जि.पुणे यास खाली उतरवून कारची झडती घेतली असता कारचे पाठीमागील डिकी मधे ट्रक टायरचे दोन ट्यूब मध्ये लपविलेली १२० लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आलेने सदर माल व स्विप्ट कार असा एकूण किंमत रुपये ४,०६,०००/- (चार लाख सहा हजार) चा माल जप्त केलेला आहे.

     सदर आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून आरोपी विरूध्द दौंड पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीने सदर गावठी दारूसाठा कोठून आणला? तो कोठे विक्रीसाठी नेणार होता? याबाबतचा पुढील अधिक तपास दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News