पीपल्स हेल्पलाईन, व भारतीय जनसंसदेच्या वतीने केंद्र सरकारचा सत्यबोधी सुर्यनामा करुन राष्ट्रीय अनागोंदी जाहीर करण्याचा निर्णय


पीपल्स हेल्पलाईन,  व भारतीय जनसंसदेच्या वतीने  केंद्र सरकारचा सत्यबोधी सुर्यनामा करुन राष्ट्रीय अनागोंदी जाहीर करण्याचा निर्णय

क्रांतिदिनी हुतात्मा स्मारकात रेड गॅझेट करणार प्रसिध्द 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदेच्या वतीने क्रांतिदिनी हुतात्मा स्मारकात केंद्र सरकारचा सत्यबोधी सुर्यनामा करुन राष्ट्रीय अनागोंदी जाहीर करुन रेड गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

देशात सोळा महिने कोरोनाच्या नावाखाली अनागोंदी माजली आहे. न्यायसंस्था, सरकार व लोकप्रतिनिधी पांढरे हत्ती झाले असून, काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही. त्यांनी कोरोनाच्या संकटात पळ काढून सर्वसामान्यांना दारिद्रय व रोगराईच्या खाईत लोटले. सर्वसामान्यांचा विचार न करता स्वतःची घरे भरण्याचे काम केले. सर्वसामान्य व्यक्तीला न्याय, कोरोना लस व आरोग्य सुविधा मिळणे देखील अवघड बनले असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.केंद्र सरकारने कोरोना काळात योग्य भूमिका घेऊन पैसे वाल्यांसाठी खाजगी दवाखान्यात पैश्याने तर सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दवाखान्यात मोफत कोरोना लसीकरण करण्याची गरज आहे. कोरोनामुळे शिक्षणाअभावी भावी पिढी कमकुवत होत चालली आहे. सततच्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तरी देखील कोरोनावर फक्त टाळेबंदीची भूमिका घेऊन चुकीचे धोरण राबविण्यात येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उन्नतचेतनेद्वारे इन्फर्मेशन व कॉन्शसनेस थिअरीचा वापर होणे आवश्यक आहे. पाकिस्तान, बांगलादेश व चीन मध्ये कोरोना आटोक्यात आला, मात्र भारतात कोरोना आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नाही. याला चुकीचे धोरण कारणीभूत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीचा पराभव स्वीकारण्या ऐवजी केंद्रीय मंत्री मंडळात शपथविधीचा भातुकलीचा खेळ खेळण्यात आला. या पूर्वीच निष्क्रिय मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज होती. मात्र सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवर फक्त घोषणा केल्या. या घोषणा अंगलट आल्या आहेत. धर्माच्या नावाचे गाजर दाखवून भाजप सत्तेवर आले. लोकशाहीत सर्वसामान्यांची फसवणुक करुन मोदी प्रणित भाजप सरकारने सत्ता मिळवली असून, फसवणुकीचा उच्चांक झाल्याने देशात अनागोंदी माजली आहे. या विरोधात संघटनांच्या वतीने आंदोलन करुन रेड गॅझेट प्रसिध्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनी होणार्‍या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News