साथ फाऊंडेशन व सेवासदन परिवार तर्फे ज्ञानश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान


साथ फाऊंडेशन  व सेवासदन परिवार तर्फे ज्ञानश्री  फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान

पुणे -साथ फाऊंडेशन , तांदूळजा व सेवासदन परिवार ,हिंगोली यांच्या तर्फे ज्ञानश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा कोरोना महामारी च्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोरोना  योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष झोहेर चुनावाला ,उपाध्यक्ष अमर काळे, सचिव राजेंद्र दीक्षित, खजिनदार यशवंत भुजबळ यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराचा गौरव करण्यात आला याप्रसंगी साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम , सचिव मीरा कदम, उपाध्यक्ष गुणवंत गणगे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात घेण्यात आला. सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील आश्रमाला ज्ञानश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली होती.साथ  फाउंडेशन या संस्थेतर्फे ऊस तोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ धनराज कदम व मीरा कदम     करत आहेत. ज्ञानश्री फाउंडेशन  गेल्या दोन वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. ज्ञानश्री फाउंडेशन तर्फे वस्तू रूपाने व धनराशी रूपाने साथ फाउंडेशन ला मदत केली आहे. तसेच ज्ञानश्री  फाउंडेशन तर्फे बॅकस्टेज कलाकार, सफाई कामगार ,झोपडपट्टी रहिवासी व इतरही काही गरजू लोकांना यांना रेशन किट, फूड पॅकेट पॅकेट व रोख  स्वरूपात कोरोना महामारी च्या लॉकडाउन काळात जीव धोक्यात घालून काम केले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News