काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवगाव शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन करून आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.


काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवगाव शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन करून आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

शेवगाव  प्रतिनिधी सज्जाद पठाण : काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्ष नेते महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल व डिझेल च्या किंमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ आंबेडकर चौक तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस अध्यक्ष डॉ. फडके यांनी केंद्र सरकारचा पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात चांगला समाचार घेतला. केंद्र सरकारने थोडीशी लाज बाळगून भाववाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बब्रु वडघने यांनी मे 2014 पासून मे 2021 पर्यंत केंद्र सरकारने पेट्रोल वरची एक्सा. ड्युटी 9 रुपयांवरून 32 रुपये वर व डिझेलची एक्सा. ड्युटी 7 रुपयावरून 27 रुपयावर नेली असल्याची गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आणून दिली. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सेवादलाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे, महेश काटे आदींनी आपल्या केंद्र सरकार विरोधातील भावना यावेळी व्यक्त केल्या.


यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्यासह नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, सेवादल कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.  बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, कोषाध्यक्ष राजू गिरगे, उपाध्यक्ष व पत्रकार निजाम भाई पटेल,महेश निजवे, एन एस यु आय अध्यक्ष महेश काटे, अमोल दहिफळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू मगर अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष जब्बार भाई शेख, चंदू निकाळजे, बाजीराव अंगारखे, सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News