अहमदनगर येथील सहकार न्यायालय जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत कार्यान्वित व्हावे सरकारचा हस्तक्षेप कमी होऊन ग्राहक न्यायालयाचा मुख्य उद्देश सफल होणार -अ‍ॅड. गवळी


अहमदनगर येथील सहकार न्यायालय जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत कार्यान्वित व्हावे  सरकारचा हस्तक्षेप कमी होऊन ग्राहक न्यायालयाचा मुख्य उद्देश सफल होणार -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- ग्राहक न्यायालय राज्य सरकारच्या अखत्यारितून काढून उच्च न्यायालयाच्या अखत्यारित आणण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे  ग्राहक न्यायालयाचा मुख्य उद्देश सफल होणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 ग्राहक न्यायालय स्थापन करुन त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. ग्राहकांचे हक्क अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने सुरु झालेले ग्राहक न्यायालय मुख्य उद्देशापासून लांब आहे. ग्राहक मंचात वयस्कर लोक नेमले जात असल्याने न्यायदान प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालते व अनेक खटले अनेक वर्षापासूल प्रलंबीत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

सहकार न्यायालय पुर्वी राज्य सरकारच्या अखत्यारित असताना मंत्र्यांची वशिलेबाजी चालत होती. मंत्र्याच्या पोल्ट्रीवर काम करणार्‍या एका व्यक्तीची चक्क न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. या विरोधात औरंगाबाद खंडपीठासमोर आंदोलन केल्यानंतर सहकार न्यायालय उच्च न्यायालयाच्या कक्षेत आणण्यात आले. न्यायसंस्था कार्यकारी मंडळाची विभागणी घटनेच्या कलम 50 प्रमाणे करण्याचे आदेश आहे. ग्राहक न्यायालय देखील याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या कक्षेत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे सरकारचा हस्तक्षेप कमी होऊन ग्राहक न्यायालयाचा मुख्य उद्देश सफल होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.तसेच अहमदनगर येथील सहकार न्यायालय जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत कार्यान्वित करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सहकार न्यायालय शहरातील दिल्ली गेटला खाजगी इमारतीत भरत असून, जुन्या न्यायालयात फक्त फलक लावण्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली सहकार न्यायालय जिल्हा न्यायालयात सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News