महापौर सौ.शेंडगे यांचा मंत्री शंकरराव गडाख हस्ते सत्कार.... नगर विकासासाठी आपले सहकार्य राहील -ना.गडाख


महापौर सौ.शेंडगे यांचा मंत्री शंकरराव गडाख हस्ते सत्कार.... नगर विकासासाठी आपले सहकार्य राहील -ना.गडाख

- अहमदनगर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवा सेना अध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे आदि. (छाया : राजु खरपुडे) 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) नगरचे महापौरपद शिवसेनेला मिळल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राज्यात शिवसेनेचे  पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्याने महानगरपालिकेस त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपणही मंत्रीपदाच्या माध्यमातूनही मनपसाठी जास्तीतजास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करु. त्यातून नगरमध्ये विकास कामे करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवावा. आपल्या अनुभवाच्या जोरावर नगर मनपाच्या माध्यमातून नगरकरांसाठी मोठी विकास कामे उभारावीत. त्यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील. त्याचबरोबरच पक्ष वाढीसाठीही आपण प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

     नगरमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभप्रसंगी अहमदनगर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवा सेना अध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे आदि उपस्थित होते.सत्कारास उत्तर देतांना सौ.शेंडगे म्हणाल्या, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य, महिला यांना मानाचे स्थान, पदे दिले आहे. त्यामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला महापौर पदाचा मान मिळाला आहे. या पदाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नगर विकासात योगदान देऊ. त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य मिळेल. त्याचबरोबर पक्ष वाढीसाठीही आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले.


     याप्रसंगी विक्रम राठोड, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.  अनिल शिंदे यांनी आभार मानले. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News