टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत - जुन्नर जवळ मार्केट ची मागणी


टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत -  जुन्नर  जवळ मार्केट ची मागणी

राजेश डोके   जुन्नर प्रतिनिधी  : जुन्नर च्या  पश्चिम भागातील उन्हाळी  टोमॅटो उत्पादक  शेतकरी चांगलाच  अडचणीत सापडत आहे.  भर उन्हाळ्यात  टोमॅटो लागवड या भागातील शेतकरीवर्गाने  कसरतीने मेहनत घेतली आहे.  सतत बाजारभाव ढासळल्याने    २५ टक्के सुध्दा  नफा झाला नाही. सतत पेट्रोल व डिझेल चे बाजार भाव वाढत असल्याने शेतकरी राजा चांगलाच संकटात सापडला आहे .बहुतेक शेतकऱ्यांनी टोमॅटो ची शेती अर्धवट सोडून दिली आहे.यामुळे  शेतकरी बाजारभाव कधी  वाढतील  या प्रतिक्षेत आहे . शेतकरी बांधवांनी खत -औषध  सोसायटी , नागरी पत संस्था व बैंक येथून कर्ज      काढुन  आणले आहे. यामुळे  कर्ज वसुली       साठी मागणी  सुरू  केली आहे. पेट्रोल व डिझेल चा   दर  सतत वाढल्याने  वाहतुकीचा खर्च  वाढला  आहे.  . बाजार भाव ढासळल्याने बजरंग महाबरे , अमोल  महाबरे,शाम महाबरे, आदित्य महाबरे, सुदर्शन  महाबरे  ,विशाल  महाबरे व मयुर  महाबरे या शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा पाहावयास मिळाल्या आहेत .केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे अशीही मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे भाजीपाला व टोमॅटो मार्केट जुन्नरच्या जवळ मार्केट झाले तर जुन्नरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी चर्चा शेतकरीवर्गात सुरू आहे .   
 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News