सेवकांनी कुटूंबाचा व पगाराचा योग्य विचार करूनच कर्ज उचलावे सोबत विमा देखील उतरावावा - कार्याध्यक्ष सुनील रेडेकर


सेवकांनी कुटूंबाचा व पगाराचा योग्य विचार करूनच कर्ज उचलावे सोबत विमा देखील उतरावावा - कार्याध्यक्ष सुनील रेडेकर

पुणे विद्यार्थी गृह नवनिर्वाचित संचालकांनचा पीव्हीजी पतसंस्थेतर्फे सत्कार सोहळा संपन्न.

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

पुणे- पुणे विध्यार्थी गृह सेवकांची सह. पतसंस्थे तर्फे  दि.12जुलै 2021 रोजी दु.2 वाजता संस्थेचे मुख्य कार्यालयात पुणे,मुबंई, नाशिक व इतर ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात गेली 112 वर्षे अखंडपणे कार्यरत असलेली नांमकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेची नुकतेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार आणि पुणे विध्यार्थी गृह संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राधाकृष्ण विखेपाटील यांचे प्रमुख उपस्थितीत नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार पतसंस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते कार्याध्यक्ष सुनील रेडेकर ,कार्यवाह संजय गीते यांचे हस्ते उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे , खजिनदार प्राचार्य विष्णुदास गावडे यांचे हस्ते कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे ,संचालक शंकर मोरे व प्रवीण रोजेकर यांचे हस्ते कुलसचिव अमोल जोशी व महेश काटे यांचे हस्ते कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ व नुकतेच रघुनाथ ढोक यांनी प्रकाशित केलेले महात्मा फुले गीत चरीत्र प्रत्येकी 5 पुस्तकाचा संच देऊन सत्कार केला. तसेच पुणे विध्यार्थी गृह संस्थेचे संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, कृष्णाजी कुलकर्णी,रमेश कुलकर्णी यांचा देखील पतसंस्थेचे अध्यक्ष ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले गीत चरीत्र प्रत्येकी 5 संच देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना कार्याध्यक्ष सुनील रेडेकर म्हणाले की आपली संस्था गरीब ,गरजु व हुशार मुलांसाठी  स्थापन झालेली आहे. फक्त फी वसूल करणे हा संस्थेचा उद्देश नाही. त्यामुळे नेहमीच विध्यार्थी,पालक व सेवकांच्या हिताचाच विचार करून चांगले , दर्जेदार कालानुरूप शिक्षण देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. तसेच सेवकांना मौलिक सल्ला देताना पुढे सुनील रेडेकर व कार्यवाह राजेंद्र कांबळे इतर पदाधिकारी म्हणाले की  सेवकांनी देखील  आपल्या पगाराचा व कुटूंब खर्चाचा योग्य विचार करूनच कर्ज उचलावे,सध्या कोव्हिडं व इतर प्रसंग पहाता  विमा उतरवल्याशिवाय कर्ज वाटप करू नये तसेच कमीत कमी व्याजदराने कर्ज कसे देता येईल हे आवर्जून पहावे म्हणजे शेवटची व्यक्ती पण कर्ज आपलेकडूनच घेतील.कमी त्रासात सहज कर्ज मिळत असल्याने  वेळ प्रसंगी काही कठोर निर्णय घेऊन कर्जदार व जामीनदार  हिताचे काम करावे अशी आशा व्यक्त करीत सर्वांनीच आपली संस्था म्हणून कार्यरत राहुन प्रामाणिकपणे काम करू या म्हणजे ही पुणे विद्यार्थी गृह संस्था राज्यात सर्वांनाच आदर्श ठरेल.

यावेळी रघुनाथ ढोक यांनी अभिनंदन करताना म्हणाले की या कोव्हिडं च्या कठीण काळांतही  शासनाकडून या वर्षीची व मागीलही काही शिष्यवृत्ती आलेली नाही तरी देखील सेवकांचे वेळेत पगार करीत आहेत ,नुकतेच विद्याभवन हायस्कुल,मुबई आणि मुक्तांगण हायस्कूल पुणेची फी देखील कमी करून राज्यातील  संस्थानपुढे प्रथम आदर्श ठेवलेला आहे याचा आम्हास अभिमान वाटतो की आपली संस्था कमीतकमी फी मध्ये मुलांना दर्जेदार  शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.ढोक पुढे असेही म्हणाले की संस्थेने प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सोय करावी .तसेच आपल्या ज्ञानाचा ,अनुभवाचा उपयोग संस्थेच्या उन्नतीसाठी व कामाची व्याप्ती वाढीसाठी करावा अशा सर्वाना शुभेच्छा देखील दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य विष्णुदास गावडे  व आभार संजय गीते यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News