मंदिर चोरीचे गुन्हयातील ६ वर्षापासून फरारी असलेला आरोपी याचेवर यापूर्वी दरोडा, घरफोडी,चोरी करणारा अखेर पोलिसाच्या जाळ्यात


 मंदिर चोरीचे गुन्हयातील ६ वर्षापासून फरारी असलेला आरोपी याचेवर यापूर्वी दरोडा, घरफोडी,चोरी करणारा अखेर पोलिसाच्या जाळ्यात

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी...!

प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

        पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,दिनांक ५/२/२०१५ रोजी १७.०० ते १८.४५ वा. चे दरम्यान पिंगोरी ता.पुरंधर जि.पुणे येथे वाघेश्वरी देवीचे मंदिराचे दरवाजाचे ग्रीलची लोखंडी साखळी तोडून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचांदीचे दागिने असा किं.रू.९६,०००/- चा ऐवज चोरून नेवून धार्मिक भावना दुखावल्या. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून जेजुरी पोलीस स्टेशनला गु.र.नं. २२/२०१५ भादंवि क. ४५४,३८०,२९५ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

            सदर गुन्हयात अमृत पांडूरंग नानावत वय २५ रा.नांदूर ता.दौंड जि.पुणे व  पोपी लुमसिंग उर्फ दिपक कचरावत उर्फ राठोड वय ३२ यांना अटक करण्यात आलेली होती. त्यांचा साथीदार प्रमोद काळूराम उर्फ जीवन नानावत उर्फ रजपुत रा.काळे पिंपरी ता.खेड जि.पुणे हा गुन्हा घडलेपासून फरारी होता.

                पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक १२/७/२०२१ रोजी LCB टिमला जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०१५ भादंवि क.४५४,३८०,२९५ (फरारी आरोपी यादी क्र.१६)  प्रमाणे दाखल असलेल्या मंदिर चोरीचे गुन्हयातील सहा वर्षापासून फरारी असलेला आरोपी नामे *प्रमोद काळूराम उर्फ जीवन नानावत उर्फ रजपुत वय २९ वर्षे रा.काळे पिंपरी ता.खेड जि.पुणे* हा केडगाव चौफुला ता.दौंड येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरून सदर ठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून यवत भांडगाव फाटा येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

     सदर आरोपी याचेवर यापूर्वी दरोडा, घरफोडी, चोरी इ. प्रकारचे खालील प्रमाणे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

   १)लोणावळा शहर पो.स्टे.गु.र.नं.६२/०८ भादंवि क. ३९७,३९४,३४

   २)लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं. ३२/१० मुं.प्रो.का.क.६५(ख)(ड)

३)जेजुरी पो.स्टे. गु.र.नं. १४५/१३ भादंवि क.३७९

४)सासवड पो.स्टे. गु.र.नं. २३५/१३ भादंवि क.३७९

५)हडपसर पो.स्टे. गु.र.नं. २५९/१३ भादंवि क.३७९

६)वडगाव मावळ पो.स्टे. गु.र.नं.१५४/१३ भादंवि क.४५७,३८०

७ )वडगाव निं. पो.स्टे. गु.र.नं. १६४/१३ भादंवि क.३७९

८)लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं.२३३/१३ भादंवि क.३७९

९)जेजुरी पो.स्टे. गु.र.नं.२२/२०१५ भादंवि क.४५४,३८०,२९५

१०)यवत पो.स्टे. गु.र.नं. १९२/१५ भादंवि क.४५४,३८०

११)आळंदी पो.स्टे. गु.र.नं. १२७/१५ भादंवि क.४३६,३४

१२)लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. १०७/१६ भादंवि क.४५९

१३)यवत पो.स्टे. गु.र.नं.४६/१६ भादंवि क.३७९

       सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास जेजुरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

                  सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,स.पो.नि सचिन काळे,स.फौ. चंद्रकांत झेंडे,पो.हवा. महेश गायकवाड, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत, पो.हवा. गुरु गायकवाड,पोना. अभिजित एकशिंगे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News