पाटस टोलनाका कर पावती वाचवण्यासाठी अवजड वाहने खुशकीच्या मार्गाने,वनविभागाचे दुर्लक्ष


पाटस टोलनाका कर पावती वाचवण्यासाठी अवजड वाहने खुशकीच्या मार्गाने,वनविभागाचे दुर्लक्ष

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : पुणे सोलापूर मार्गावर पाटस टोलनाका येथील टोल पावती वाचविण्यासाठी अवजड वाहने तसेच खुशकीचा मार्ग माहीत असलेले चारचाकी वाहने या

वनविभागाच्या हद्दीतून जात असलेल्या मार्गाचा अवलंब करत असल्याचे तसेच वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत,पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या पुढे बारामती कडे जाणारा मार्ग आहे, त्याबाजूला जाणारी अवजड वाहने पाटस कारखाना रस्त्याने पुढे गेल्यावर वनविभागाच्या हद्दीतून कच्च्या रस्त्याने पुढे बारामती रस्त्याला

लागत आहे,यापूर्वी पहाटेच्या वेळी पायी चालणाऱ्या एका व्यक्तीचा अवजड वाहनाखालीअपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे, वनविभाग यांनी दोन ठिकाणी माती दगड टाकून रस्ता बंद केला आहे परंतू वाहनचालक पुन्हा शेजारी दुसरा रस्ता तयार करून त्याच मार्गाने जाऊन टोल पावती वाचविण्यासाठी धडपडत आहेत,परंतू वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत धरून जगावे लागते त्यामुळे अशा खुशकीच्या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकावर योग्य ती कारवाई करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News