बा.देशपांडे रूग्‍णालयात गरोदर मातेच्‍या लसीकरणाचा शुभारंभ


बा.देशपांडे रूग्‍णालयात गरोदर मातेच्‍या लसीकरणाचा शुभारंभ

दिव्‍यांग व्‍यक्‍तीच्‍या लसीकरणासाठी मोबाईल व्‍हॅन पथकाची सुरूवात

कोरोना विषाणूला हद्दपार करण्‍यासाठी लसीकरणाला प्राधान्‍यक्रम – मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) कोरोना संकट काळामध्‍ये गरोदर मातेच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून अहमदनगर महानगरपालिकेला सुचना केल्‍या होत्‍या त्‍यानुसार आज कै.बा.देशपांडे रूग्‍णालयामध्‍ये गरोदर मातेला कोवीड लसीकरणाला सुरूवात केला आहे. नागरिकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने टप्‍प्‍याने लसीकरण सुरू आहे.  गरोदर मातेची रोग प्रतिकारशक्‍ती कमी असते. त्‍यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्‍याची भिती मोठया प्रमाणात असते. तसेच लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. त्‍या ठिकाणी गरोदर मातेला जाणे योग्‍य नाही. त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था कै.बा.देशपांडे रूग्‍णालयामध्‍ये करण्‍यात आलेली आहे. सध्‍याच्‍या काळामध्‍ये नागरिकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे हा महत्‍वाचा विषय आहे. त्‍यानुसार विविध उपाय योजना सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग नगर शहरामध्‍ये कमी झाला असला तरी नागरिकांनी आपल्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍यावी. संसर्ग बाधीत रूग्‍णाच्‍या संपर्कातील व्‍यक्‍तीची चाचणी करून घ्‍यावी जेणे करून दुस-याला संसर्ग होणार नाही त्‍यामुळे  लवकरात लवकर नगर शहर कोरोना मुक्‍त होण्‍यास मदत होईल.  याच बरोबर दिव्‍यांग व्‍यक्‍तीला लसीकरण केंद्रावर लस घेण्‍यासाठी जाता येत नसल्‍यामुळे मनपाच्‍या वतीने दिव्‍यांग व्‍यक्‍तीच्‍या घरी जावून लसीकरण केलें जाणार आहे. यासाठी मोबाईल व्‍हॅन लसीकरण फिरते पथक सुरू केले आहे. लवकरात लवकर सर्व नागरिकांचे लसीकरण व्‍हावे यासाठी लस उपलब्‍धतेसाठी मा.शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्‍याचे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांचे हस्‍ते करण्‍यात आले.


      अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने कै.बा.देशपांडे रूग्‍णालय येथे गरोदर मातेच्‍या व दिव्‍यांगणासाठी लसीकरण फिरत्‍या पथकाचा शुभारंभ मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांचे हस्‍ते झाला यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे,उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले, मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, आरोग्‍याधिकारी डॉ.सतिष राजूरकर, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती मा.सौ.लताताई शेळके, उपसभापती मा.सौ.सुवर्णाताई गेणाप्‍पा, माजी महापौरतथा नगरसेविका मा. सौ.सुरेखाताई कदम, नगरसेविका मा.श्रीमती मंगलाताई लोखंडे, आदी सह आरोग्‍य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे म्‍हणाल्‍या की, गरोदर मातेच्‍या लसीकरणा बरोबरच सर्वच महिलांसाठीच्‍या लसीकरणाला प्राधान्‍यक्रम दिला जाणार आहे. मनपाची आरोग्‍य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्‍यासाठी काम करिल . मनपाच्‍या माध्‍यमातून गोरगरिब रूग्‍णांना मोफत सेवा देण्‍यासाठी राहिल. कै.बा.देशपांडे रूग्‍णालय येथे कोवीड रोग प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ झाला असून गरोदर महिलांनी याचा लाभ घ्‍यावा. गर्दी न करता शांततेत व शिस्‍तीत यावे असे आवाहन त्‍यांनी केल. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News