ॲड. युवराज शिंदे यांचा वाढदिवस बॉडी शो स्पर्धा व वृक्षरोपणाने साजरा


ॲड. युवराज शिंदे यांचा वाढदिवस बॉडी शो स्पर्धा व वृक्षरोपणाने साजरा

बॉडी शो स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी ॲड.युवराज शिंदे,शिवाजी शिंदे,अमित तवले,भरत पवार,अभिजित शहा,अँड.किरण कातोरे,आनंद नांदुरकर,लक्ष्मण खोडदे,प्रशांत गंधे,दिलीप शिंदे,राजेंद्र शिंदे आदी. (छाया-अमोल भांबरकर)

बॉडी शो स्पर्धेमुळे तरुणांना प्रोत्साहन-आमदार संग्राम जगताप

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) ॲड.युवराज शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त तरुणांसाठी बॉडी शो स्पर्धा व परिसरात वृक्षरोपण करून सामाजिक संदेश दिला आहे.कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला व्यायामाचे महत्व समजले आहे.कल्याणरोड परिसरातील नागरिकांसाठी शिंदे फिटनेस क्लब मुळे निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी तरुणांना सोय झाली आहे.बॉडी शो स्पर्धेमुळे तरुणांना प्रोत्साहन मिळेल व या स्पर्धेतून खेळाडू तयार होतील. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्याने परिसर सुदर होऊन सर्वाना स्वच्छ हवा व ऑक्सिजन मिळेल.अँड.युवराज शिंदे यांनी महालक्ष्मी मंदिर बांधून शिंदे परिवाराचा सामाजिक व अध्यात्मिक वारसा पुढे चालविला आहे.प्रत्येकाने सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करावा.असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.                                        कल्याणरोड वरील अनुसयानगर येथे ॲड.युवराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसयानगर मित्र मंडळ व शिंदे फिटनेस क्लब तर्फे बॉडी शो स्पर्धा व वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते. याप्रसंगी ॲड.युवराज शिंदे,शिवाजी शिंदे,अमित तवले,भरत पवार, अभिजित शहा,ॲड.किरण कातोरे,आनंद नांदुरकर,लक्ष्मण खोडदे,प्रशांत गंधे,दिलीप शिंदे,राजेंद्र शिंदे ,गोरख वाघस्कर,रोहित काळोखे,भैया मुंडलिक,रवी मैड, किरण मंजुळे,धनंजय सातपुते,ॲड.राहुल मेहेञे,विकास त्र्यंबके,अरुण ढाकणे,शंतनू डुबे पाटील,अभिजित गंधे,रोहित पठारे,अभिषेक भोसले, मनोज गायकवाड,सिध्दांत वाणी आदी उपस्तीथ होते.शिंदे फिटनेस क्लब अंतर्गत बॉडी शो स्पर्धेचे विजेते प्रथम-अनिकेत ढाणके,द्वितीय-अनिस सहानी,तृतीय-इम्रान सय्यद हे आहेत.विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपञ,ट्राॅफी व टी शर्ट देऊन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले.सागर सुरपुरे,दीपक बारस्कर,शैलेश गवळी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहिले. ॲड युवराज शिंदे म्हणाले कि,बॉडी शो स्पर्धेतून जिल्हास्तरीय व राष्ट्रीय खेळाडू घडावेत.यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन व स्पर्धेसाठी लागणारा खर्च शिंदे फिटनेस क्लब तर्फे देण्यात येईल.या स्पर्धेत १८ खेळाडूंनी सहभाग घेतला.आमदार संग्राम जगताप यांनी कल्याणरोड परिसरात विकासाची गंगा आणली आहे.कल्याणरोड वरील अनुसयानगर येथे प्रथम रस्त्याचे काम केले आहे.तसेच ड्रेनेज,लाईट आदी सुविधा दिल्याने परिसराचा विकास झाला आहे.राजकारण नव्हे तर सामाजिक दृष्टीकोनातून परिसर विकासाचे काम करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण खोडदे यांनी केले तर आभार शिवाजी शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी कल्यानरोड परिसरातील नागरिक उपस्तिथ होते.                                                    


जाहिरात
Search
विडिओ
Recent News