दिव्यांग संघटनेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचा सन्मान


दिव्यांग  संघटनेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचा सन्मान

नानासाहेब मारकड भिगवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बापू पाटील  राज्य सचिव मा.परमेश्वरजी बाबर उपाध्यक्ष महादेव सरवदे,

डॉ.कोगणुलकर,सातारा  जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे प्रचिताई थत्ते राज्यसंचालक श्री धनंजय घाटे,पुणे जिल्हाध्यक्ष, नानासाहेब मारकड,जिल्हा उपाध्यक्षा मा.मीनाताई चव्हाण,जिल्हा कार्याध्यक्ष सुहासजी संचेती जिल्हा सचिव अजयजी वत्रे जिल्हा पुणे प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग शिंदे नूतन तालुकाध्यक्ष इंदापूर रविंद्र शेलार तालुकाध्यक्ष आंबेगाव  शैलेंद्र चिखले हवेली तालुका उपाध्यक्ष विनायक जाधव,अंगणवाडी ताई  हिंजवडी देवकर ताई,आदींच्या  उपस्थितीतहा सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हयातील मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी जिल्हा परीषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना स्थायीत्व लाभ , आश्वासित प्रगती योजनेतील पहिला लाभ , दुसरा लाभ , तिसरा लाभ तसेच सर्व सवर्गातील पदोन्नती बाबतीत सर्व लाभ मिळवून दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने दिव्यांग परीचर सवर्ग यांच्या पदोन्नतीबाबत आणि दिव्यांगाना उपकरण व तंत्रज्ञान साहित्यमिळावे याबाबत चर्चा करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News