पिंपळगाव घोडे येथे बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर घोडेगाव पोलीसांचा छापा.


पिंपळगाव घोडे येथे बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर घोडेगाव पोलीसांचा छापा.

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथे जनावरांच्या गोठयात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांनी छापा टाकून संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, राजेंद्र विठ्ठल मचाले वय- ५५ वर्षे, हे राहणार मंचर ता- आंबेगाव, जि-पुणे. तसेच रामदास कोंडाजी दिवेकर वय- ६१ वर्षे राहणार पिंपळगाव घोडे ता- आंबेगाव तसेच सुभाष दत्तात्रय भास्कर वय- ३८ वर्षे राहणार पिंपळगाव घोडे, ता- आंबेगाव तसेच कालिदास गोविंद काळे वय-४२ वर्षे राहणार धोंडमाळ ता- आंबेगाव तसेच संतोष एकनाथ पाडळे  वय- ३४ वर्षे राहणार पिंपळगाव घोडे ता- आंबेगाव आणि राजेंद्र आप्पाजी काळे वय- ५५ वर्षे राहणार पिंपळगाव घोडे ता- आंबेगाव जि-पुणे.  हे सर्वजण दिनांक ९ जुलै रोजी साडेपाच च्या सुमारास मौजे पिंपळगाव घोडे ता- आंबेगाव च्या हद्दीत ओढ्याच्या कडेला असणाऱ्या राहुल बाबाजी ढमढेरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात पैशांवर बिगर परवाना तीन पत्ती (फ्लॅश) नावाचा जुगार खेळत असताना अचानक छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी फिर्याद दत्तात्रय किसन जढर वय-३९ वर्षे यांनी दिली आहे.

या जुगार अड्ड्यावर १४,६६० रुपये एवढी रोख रक्कम मिळाली असून त्यात ५००, २००, १००, ५०, १० रुपयांच्या नोटा आहेत. तसेच २०रू. किंमतीचे ५२ पत्ते असलेला कॅट सापडला आहे. तसेच २०० रुपये किंमतीचे ५५५ असे लिहलेले राखाडी रंगाचे २ कॅटचे बॉक्स सापडले आहे.

एकूण १४८८० रूपये एवढी रक्कम व जुगारीची साधने सदर ठिकाणी सापडली आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तींवर मुंबई जुगार कायदा कलम १२ अ भा. द. वि कलम १८८, २६९ मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वायाळ करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News