चोपडज येथे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा


चोपडज येथे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

चोपडज (ता.बारामती) याठिकाणी कृषी दिनाच्या अनुषंगाने व हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. १ जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात आला असून १ जुलै ते ७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमास चोपडजचे उपसरपंच तुकाराम पंढरीनाथ भंडलकर, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय गाडेकर, समीर गाडेकर, कृषीकन्या कोमल प्रकाश गाडेकर, दिपक गायकवाड, सागर बाळासाहेब गाडेकर, अनिल गाडेकर, दादा गाडेकर, प्रकाश गाडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी तुषार शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News