वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांच्या मध्यस्थीने सुरू असलेले आदिवासी महिलांचे उपोषण स्थगित


वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांच्या मध्यस्थीने सुरू असलेले आदिवासी महिलांचे उपोषण स्थगित

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

मजुरी करणा-या आदिवासी व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केलेले रद्द करणे बाबतचे उपोषण  पासुन सुरू शेवगाव पोलीस स्टेशन समोर आदिवासी महिलांचे असलेले उपोषण दोन दिवसानतंर थांबवण्यात आले* उपोषणास बसलेल्या आदिवासी महीला व त्यांच्या नातेवाईकांनी वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर व शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलालभाई यांच्याशी संपर्क साधून मौजे गदेवाडी ता शेवगांव येथील चोरी प्रकरणी ईयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेला सोपान साईनाथ काळे हा १७ नंबर चा फॉर्म भरण्याकरिता आलेला असतांना,व  नारायण अंकुश पवार यांना विनाकारण जेल मध्ये टाकले आहे असे उपोषणकर्त्या कविता काळे,रंजना पवार,सुमनबाई पवार व त्यांचे नातेवाईक यांनी सांगितले की, हा एक प्रकारचा आमच्या कुंटुबावर अन्याय झालेला आहे या करिता वंचित बहूजन आघाड़ी ने आम्हाला योग्य सहकार्य करावे असे सांगितले भरपावसात आदिवासी महीला भगीणी उपोषण करतात याचा विचार करून दुसर्या दिवसी मा किसन चव्हाणसर हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी शेख प्यारेलालभाई, मुकेश मानकर, रमेश खरात,शेख सलीम जिलानी,सागर हवाले, प्रसाद गरूड़,अन्सारभाई कुरैशी,सागर गरूड़, रविन्द्र निळ, दिलीप वाघमारे, यांना घेऊन उपविभागीय अधिकारी मा सुदर्शन मुंढे साहेब यांची भेट घेवून सविस्तर माहीती दिली.


या प्रसंगी शेवगांव/ पाथर्डी, नेवासा उपविभागीय अधिकारी मा सुदर्शन मुंढे साहेब, शेवगांव पोलीस निरीक्षक मा पाटील साहेब ,नेवासा पोलीस स्टेशन निरीक्षक मा करे साहेब उपस्थित होते

या प्रसंगी मा उपविभागिय आधिकारी मा सुदर्शन मुंढे साहेब म्हणाले की योग्य चौकशी करून कोणत्याही प्रकारचा खोटा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही 

उपोषण करणार्या आदिवासी महीलांना *नारळ पाणी देवून* उपोषण थांबवण्यात आले कोरोना नंतर सर्व आदिवासी कुंटुबातील सुशिक्षित बेरोजगारांचा लवकरच मेळावा घेण्यात येईल असे तसेच निरपराध तरुणांना पोलिसांनी त्रास दिल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल आम्ही गुन्हेगारांना पाठिशी घालत नाही गुन्हेगारी चे समर्थनही करत नाही पण गुन्हेगाराला जात नसते ,उच्चभ्रू पांढरपेशी जातीतील शिकलेले तरुणही व्यसनासाठी आणि ऐशी आरामी चैनी जीवन जगण्यासाठी गुन्हेगारी कडे वळलेले आहेत याचाही अभ्यास पोलिसांनी करावा एकाच समाजाला टार्गेट करू नये असा इशाराही मा किसन चव्हाणसर म्हणाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News