चित्रपट महामंडळाच्या बॅक स्टेज सभासदांना विमा वाटप


चित्रपट महामंडळाच्या बॅक स्टेज सभासदांना विमा वाटप

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

पुणे:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामगार वर्गातील सभासदांना अपघाती विमा पॉलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. आनंदी वास्तूचे सुप्रसिद्ध वास्तु तज्ञ आनंद पिंपळकर यांनी हा विमा पुरस्कृत केला आहे. विमा पॉलिसीचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश परदेशी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व राष्ट्रीय निमंत्रक आरपीआय वि आ (आठवले) तसेच कायदेशीर सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ॲड मंदारभाऊ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, खजिनदार संजय ठूबे सहकार्यवाह निकिता मोघे, संवाद पुणेचे सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, अभिनेत्री अश्विनी शेंडे, अभिनेत्री श्रुतिका चौधरी, हडपसर कलासंघाचे योगेश गोंधळे, अभिनेत्री व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महिला समारंभ समिती सदस्य स्वाती हनमघर,  सुशील सर्वगौड- अध्यक्ष रिपब्लिकन चित्रपट आघाडी, लेखक दिलीप मोरे यांची उपस्थिती होती.


याप्रसंगी आनंद पिंपळकर आपल्या मनोगतात म्हणाले की, आलंय माझ्या राशीला या चित्रपट निर्मिती दरम्यान बॅकस्टेज कामगारांचे कष्ट आणि व्यथा लक्षात आल्या. या लोकांना अडीअडचणी प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून अपघाती विमा पॉलिसी देण्याचे ठरविले व त्याचे प्रातिनिधिक वितरण आज मला करता आले याचे समाधान वाटते. 

प्रवीण तरडे यांनी आनंद पिंपळकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे मनोमन कौतुक केले व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आपल्या सभासदांसाठी हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल माननीय अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना धन्यवाद दिले. 

प्राजक्ता गायकवाड, रमेश परदेशी, ॲड मंदारभाऊ जोशी यांनी आनंद पिंपळकर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला धन्यवाद दिले. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आनंद पिंपळकर यांच्यासारखे दानशूर दाते महामंडळाच्या सभासदांना अशी मदत करतात त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही चित्रपट महामंडळ आपल्या सभासदांना काही ना काही मदत देऊ शकते,अशी भावना व्यक्त केली. 

सहकार्यवाह निकिता मोघे आणि खजिनदार संजय ठुबे यांनी उपस्थितांचे आभार मानले व हा छोटेखानी कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम पार पडला असे सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News