कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कडून सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात


कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कडून सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात

सावकाराने व्याजापोटी कोरे धनादेश आणि स्विफ्ट कारचीही नोटरी करून घेतली

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी : कर्जत पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर कर्जत तालुक्यातील अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून 

     संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) वय २७ रा. ता.कर्जत यांनी दि.७ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सावकार एजाज उर्फ भोप्या सय्यद रा.कर्जत याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी सावकार एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर २०२० मधे व्याजाने २ लाख रुपये घेतले होते.मात्र त्या व्याजाचा दर हा एक लाख रुपयाला प्रतिदिन १ हजार रुपये व्याज असा होता. परंतु लॉकडाउन मुळे ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दिड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते. त्यानंतर आरोपी सावकाराने व्याजाला चक्रीवाढ व्याज लावल्याने मुदद्लेची रक्कम ही ६ लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले. ३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे आरोपी भोप्या सय्यद ने सांगितले.आरोपी हा पैसे वसुल करण्यासाठी फिर्यादीची गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता. तसेच सावकाराने  फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले होते . परंतु फिर्यादीने सांगितले होते की  सध्या माझी पैसे देण्याची परीस्थिती नाही तर फक्त माझे व्याज माफ करा. मी तुम्हाला मुद्दल रक्कम टप्प्याटप्प्याने देतो अशी विनंती केली मात्र आरोपीने काहीही ऐकले नाही.आरोपीच्या सततच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती. त्यामुळे फिर्यादीला पोलिसांत जावे लागले. संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे  गु.र.न.३२८/२०२१ भा.द.वि. कलम ३४१,५०४,५०६ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ नुसार  सावकार भोप्या सय्यद वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली. या कारवाईत पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे सहभागी झाले असुन पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक यादव यांच्या खाजगी सावकारकी मोहिमेने गोरगरीब, सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली असुन याबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

      कुणीही अवैध सावकारकी करुन कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे,घरी येणे,शिवीगाळ करणे,वस्तु उचलून नेणे अगर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर याद राखा. सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा.कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची पोलीस काळजी घेतील.

      पो. नि. चंद्रशेखर यादव, कर्जत. 

   - एजाज उर्फ भोप्या सय्यद यांच्या सारखे कर्जत मधे अजुन कीती सावकार आहेत. का या सावकारांचे कोणी गॉडफादर सावकार आहेत याचा खोल तपास कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी करावा अशी सामान्य जनतेच्या भावना आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News