१५ लाखाचा अवैध वाळूचा साठा जप्त : पाटस मध्ये पुणे एलसीबी पथकाची दबंग कारवाई


१५ लाखाचा अवैध वाळूचा साठा जप्त : पाटस मध्ये पुणे एलसीबी पथकाची दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:पाटस ता.दौंड येथे बेकायदेशीर व अवैध रितीने गावातील ओढ्यातून उत्खनन करून काढण्यात आलेल्या सुमारे पंधरा लाखाच्या वाळू साठ्यावर पुणे ग्रामीण पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई केलेबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांनी दिली.

      मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-सोलापूर रोडला पेट्रोलींग करीत असताना  पथकास  दिनांक ९ जुलै २०२१ रोजी सायंकाळचे सुमारास पाटस, खारतोडे मळा स्मशान भूमीजवळील मोकळ्या जागेत ता.दौंड जि.पुणे येथे कोणीतरी अज्ञात इसमाने बेकायदेशीरपणे  मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केला असलेबाबत बातमी मिळाले वरून गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा मिळून आला. त्याबाबत पुढील कारवाईसाठी त्यांनी दौंड तहसीलदार यांना कळवून पाटस गाव कामगार तलाठी श्री. दिवेकर व दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे ओढ्यातून व जमिनीतून उत्खनन करून काढण्यात आलेला सुमारे ३०० ब्रास वाळूचा साठा किं.रु. १५,००,०००/- (पंधरा लाख) चा मिळून आलेने तो जप्त करण्यात आलेला आहे.

     सदर ठिकाणी करण्यात आलेला वाळू साठा कोठून आणला? वाळू साठा कोणी केलेला आहे? याबाबतची माहिती घेऊन पुढील अधिक कारवाई करण्यात येत आहे.

     सदरची कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे, दगडू विरकर यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News