लोककलावंतांच्या मागण्या सरकार दरबारी -----विजय डाकले अध्यक्ष क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शासन समिती महाराष्ट्र राज्य


लोककलावंतांच्या मागण्या सरकार दरबारी -----विजय डाकले अध्यक्ष क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शासन समिती महाराष्ट्र राज्य

राजेश डोके जुन्नर प्रतिनिधी :   

राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील 

  यांच्या १४ व्या पुण्यस्मरणाचे  आयोजन राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थाच्यावतीने  साजरा करण्यात आला.

     या   प्रसंगी समाज भूषन पुरस्कार स्विकारताना  विजय डाकले यांनी सांगितले की  विजय डाकले   "कोरोनाच्या काळातील लोककलावंतांच्या वेदना अतिशय वेदनादायी आहेत.   

   महाराष्ट्र शासन हे शाहू, फुले ,आंबेडकर ,या महामानवांच्या विचारांचे आहे .त्यामुळे कलावंतांच्या प्रश्नांची दखल हे शासन निश्चित पद्धतीने घेईल यासाठी मी प्रयत्नशील राहील .

 नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेच्या कार्याचा गुणगौरव केला .ही संस्था सतत लोककलावंतांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे.  मंचर शहराच्या  नवनिर्वाचित सरपंच किरण  राजगुरू म्हणाल्या ,    राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील ही संस्था  समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करीत असते. या संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे .

१४ व्यापुण्यस्मरणनिमित्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक शासन  समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय डाकले यांना समाज भूषण पुरस्कार राजेश  नागुजी डोके यांना "पत्रकारिता पुरस्कार"तर गुणवंत कलावंत पुरस्कार  भगवान नारायण गायकवाड यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते  १०० लोककलावंतांना किरणा किटचे वाटप करण्यात आले

यानिमित्ताने   समाजसेवक शांतु डोळस , शिवाजी राजगुरू  ,बाळासाहेब भांडे, मनोज कांबळे  माजी मुख्याध्यापक हरिचंद्र नरसुडे,  दादा आल्हाट आदी मान्यवरांनी मनोगत केले. 

संस्थेचे कार्यआध्यक्ष  आत्माराम कसबे, सचिव अमित आल्हाट , सदस्य साईनाथ  कनिंगध्वज व अनिल  खुडे, ज्येष्ठ ताशा वादक बशीर बेल्हेकर, ज्येष्ठ तमाशा कलावंत पमाजी पंचरास,  सुभाष पंचरास, संदीप पंचरास, दादाभाऊ पंचरास ,ज्ञानेश्वर पंचरास ,संदिप पंचरास, नरेश पंचरास,ह .भ .प सोपान  राजगुरू, सुधाकर राजगुरू,  सुधाकर पोटे, विजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते 

 सूत्रसंचालन व प्रास्ताविक  पत्रकार, संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट  आभार  अनिल शिंदे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News