श्रीगोंदा तालुक्यात अखेर वरुणराजा बरसला!


श्रीगोंदा तालुक्यात अखेर वरुणराजा बरसला!

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी- गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात मान्सूनने हुलकावणी दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी पावसाची आतूरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी ४:३० वाजता मेघांनी एकच गर्दी केली आणि सुमारे दिड तास कोसळलेल्या पावसाच्या सरींनी वातावरण आल्हाददायक केले. त्यामुळे लोणी, चिंभळे,बेलवंडी,हंगेवाडी, वडाळी, मढेवडगांव,लिंपनगाव,काष्टी इ.भागांतील बळीराजा या पावसाने सुखावला आहे.

 मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पेरणीची कामे खोळंबल्याने बळीराजा पावसाची आतूरतेने वाट पाहत होता. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील  पाणीपुरवठा कमी होईल की काय असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा ठाकला होता. पावसाने हजेरी लावावी यासाठी सर्वांनीच वरुणराजाला साकडे घातले होते. 

 अखेर गुरुवारी दुपारनंतर तापलेल्या वातावरणात अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि तब्बल दीड तास बरसून गेले.त्यामुळे शेतकर्‍यांची पीक सिंचनाची गरज भागली असली तरी, नुकसानीची शक्यताही नाकारता येत नाही.या पावसामुळे माना टाकणारी पिके तरारली असली तरी पाणी शेतात साचले.या धुव्वाधार पावसामुळे शेतकर्‍यांची पीक सिंचनाची गरज भागली असली तरी सखल भागातील पिके धोक्यात आली असल्याची शक्यता आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News