कर्जत रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी इंजि. रामदास काळदाते तर सेक्रेटरी पदी राजेंद्र जगताप यांची निवड


कर्जत रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी इंजि. रामदास काळदाते तर सेक्रेटरी पदी राजेंद्र जगताप यांची निवड

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी : रोटरी इंटरनॅशनल ही संपूर्ण जगभर  दैदिप्यमान समाजोपयोगी कार्य करणारी जागतिक नामांकित सेवाभावी संघटना असून कर्जत शहरातील दातृत्ववान व कर्तृत्ववान व्यक्तींचा या संघटनेत समावेश असलेल्या रोटरी क्लब ने आपली सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार रो. नानासाहेब आगळे यांनी केले.

कर्जत शहरातील रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांचे वतीने रोटरी वर्ष २०२१ - २२ या वर्षा साठी निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नवीन  रोटरी सदस्य यांच्या स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यात आगळे  बोलत होते.ते पुढे म्हणाले की गेल्या वर्षभरात कोविड परिस्थितीस सामोरे जात असताना रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी ने स्थानिक प्रशासनास  वेळोवेळी बहुमोल सहकार्य केले आहे. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वच्छता अभियानात  रोटरी क्लबने केलेल्या कामाचा गौरव केला. यावेळी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की कर्जत शहरातील सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित करण्यासाठी व त्याद्वारे सामाजिक स्वास्थ्य अबाधित  राखण्यासाठी कर्जत रोटरी क्लबच्या सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावत असले बाबत आवर्जून उल्लेख केला.


यावेळी मावळते अध्यक्ष विशाल म्हेत्रे यांनी वर्षभरात रोटरी क्लब मार्फत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सन २०२१ - २२ या रोटरी वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात अध्यक्ष पदी इंजिनिअर रामदास काळदाते तर सेक्रेटरी पदी राजेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या नुतन पदाधिकाऱ्यांचा लवकरच पदग्रहण समारंभ प्रांतपाल यांचे उपस्थित होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे  संस्थापक डॉ. संदीप काळदाते यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रो. गणेश जेवरे यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य पप्पूशेठ नेवसे, उपमन्यु शिंदे, अनिल तोरडमल, विशाल मेहेत्रे, अभय बोरा, प्रशांत फलके, सदाशिव फरांडे, नितीन तोरडमल, सचिन धांडे, डॉ संदिप काळदाते, नितीन देशमुख, इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News