नगर जिल्ह्यातील ऊस कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता द्यावा - फुंदे


नगर जिल्ह्यातील ऊस कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता द्यावा - फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : उसाचा हंगाम संपला तरीही अजून काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिल अदा केलेली नाहीत त्यांच्यावर साखर आयुक्तांनी कारवाई करून व्याजासकट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत तसेच शासनाने ठरवून दिलेल्या ७०%३o त फॉर्म्युला प्रमाणे शेतकऱ्यांना इथेनॉल, मळी, बगॅस स्पिरिट सॅनिटायझर वीजनिर्मिती यामध्ये मिळणारा नफा कारखानदारांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा तसेच कोरोना संकटामुळे आधीच शेतकऱ्यांचा मोठा तोटा झालेला असून त्यांना तातडीने दिलासा देण्यात यावा

 तसेच मागील हंगामापेक्षा या हंगामामध्ये उसाला टना मागे 25OO रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरयांना होती परंतु अतिरिक्त ऊस असल्याचे भासवल्याने  शेतकऱ्यांनी ऊस तोडणी वरती भर दिला त्यामध्ये ऊस तोडणी करतांनी शेतकऱ्यांना एकरी पाच ते दहा हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले तरी कारखानदारांनी विनाविलंब 70% 30 फॅरमुला प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचा दुसरा हप्ता तातडीने शेतकरयांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी साखर आयुक्त पुणे व साखर उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे दत्तात्रय फुंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News