अभिलाष घावटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड


अभिलाष घावटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी: शिरूर ग्रामीण ( रामलिंग ) ता.शिरूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिलाष घावटे यांची बिनविरोध निवड झाली.

       जास्तीत जास्त सदस्यांना उपसरपंचपदावर काम करण्याची संंधी मिळावी म्हणुन उपसरपंचपदाचा उज्वला नेटके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सोमवार दि.५ रोजी सरपंच नामदेवराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेण्यात आली.यावेळी उपसरपंचपदासाठी एकमेव अभिलाष घावटे यांचा अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

      मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,माजी आदर्श सरपंच अरूण घावटे,माजी सरपंच विठ्ठल घावटे,नगरसेवक नितीन पाचर्णे,ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांसह सर्व सदस्यांनी यांनी नवनियुक्त उपसरपंच अभिलाष घावटे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News