लाडजळगाव गटातील मागील बॅकलॉक भरून काढत आहे- सौ.हर्षदा काकडे.


लाडजळगाव गटातील मागील बॅकलॉक भरून काढत आहे- सौ.हर्षदा काकडे.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव तालुक्यातील चापडगाव ते वरखेड रस्त्यासाठी १५ वर्षांपूर्वी कै.ह.भ.प.नारायण महाराज यांनी पहिल्यांदा माझ्यापुढे या रस्त्याचा शब्द टाकला होता. निवडून आल्यानंतर पहिले काम मी या रस्त्याचे केले होते. आताही दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी वरखेड ते मंगरूळ रस्त्याची मागणी माझ्याकडे केली होती. आज प्रत्यक्षात या कामाचे भूमिपूजन आपण करतोय. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी जसे एकत्र आले तसे रस्ता होईपर्यंत एकजुटीने सर्वसांमताने करून घ्या असे प्रतिपादनजि.प.सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी आज वरखेड याठिकाणी केले.

सौ.हर्षदाताई काकडे यांच्या स्वखर्चातून होत असलेल्या वरखेड ते मंगरूळ रस्ता मजबुतीकरण कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच परमेश्वर तेलोरे, उपसरपंच विकास शिरसाट, भाऊसाहेब दहिफळे, योगेश तेलोरे, संदीप शिरसाट, भागिनाथ शिरसाट, रेवन नागरे, गोरक्षनाथ पवार, अशोक पातकळ, उद्धव शिरसाट, भास्करराव तेलोरे, रेवन शिरसाट, सारंगधर खरमाटे, बन्सी शिरसाट, महादेव नागरे, विलास दहिफळे, प्रभाकर खरमाटे, भास्कर तेलोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना सौ. काकडे म्हणाल्या की, लाडजळगाव गणात पूर्वी कोणी जिल्हा परिषद सदस्य होतो की नाही अशी काहीशी परिस्थिती त्या भागात होती. त्यामुळे मोठा बॅकलॉक मला भरून काढावा लागला. मागीलवर्षी कोविडमुळे जि.प.चा पूर्ण निधी कोविडसाठी वापरला गेला. १ रु. देखील निधी जि.प. सदस्यांना मिळाला नाही. परंतु आता वरखेडसाठी ०५ लक्ष रुपयांची स्मशानभूमी मंजूर झाली आहे. लवकर तिचे भूमिपूजन करणार आहोत. पुढील काळातही भरीव निधी आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सदरचा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे यासाठी तुम्ही सर्वजण मिळून सहकार्य करा असेही त्या बोलताना म्हणाल्या.

१५ वर्षापूर्वी देखील सौ.हर्षदाताई काकडे यांनीच हा रस्ता दिला होता. त्यानंतर या रस्त्यासाठी खूप ठिकाणी पाठपुरावा केला परंतु सर्वांनी आमच्या निवेदनास केराची टोपली दाखवली. परंतु सौ.काकडेताई यांच्याकडे मागणी करताच त्यांनी दुसऱ्यांदा आम्हास या रस्त्यासाठी निधी दिला त्याबद्दल ताईंचे मनपुर्वक आभार व्यक्त केला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News