वंचित बहूजन आघाड़ी तर्फे वयोवृद्ध पेन्शनधारकांचा मोर्चा


वंचित बहूजन आघाड़ी तर्फे वयोवृद्ध पेन्शनधारकांचा मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगांव मार्केट यार्ड शाखा एडीसीसी येथे भव्य मोर्चा पैठणरोड, जूना सरकारी दवाखाना येथून निघाला या मोर्चा चे कुशल नेतृत्व मा किसन चव्हाणसर,शेख प्यारेलालभाई यांनी केले

वंचित बहूजन आघाड़ी तर्फे शेवगांव येथील मायबाप डोलधारकांना तेथील मॅनेजर व काही कर्मचारी अपमानित करुन अपमानजनक वागणूक देतात म्हतारे नंतर ये ,तुमची या बॅंकेत ठेव आहे का ? तुमचे डोलचे पैसे आले नाही,नंतर या कोरोना महामारी असल्याने नंतर या अशा प्रकारे वयस्कर माता भगीनींना तुच्छतेची वागणूक देतात  असे का करतात साहेब ,या बाबत तेथील मॅनेजर व कर्मचारी यांना जाब विचारण्या करिता वंचित बहूजन आघाड़ी चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांच्या नेतृत्वाखाली वयोवृद्ध पेन्शनधारक यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा मध्ये वयस्कर मायबाप डोलधारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते छत्रपति शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शाहू महाराज,अण्णाभाउ साठे, जिजाऊ माता, महात्मा फुले, महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या *गोर-गरीब वयोवृद्ध पेन्शन धारकअपनास्पद वागणूक देणार्या बॅंक आधिकार्यांचा धिक्कार असो* डोलधारकांना अरेरावी करणार्या बॅंक आधिकार्यांचा धिक्कार असो अशा ही घोषणा देण्यात आल्या शेवगांव मार्केट यार्ड शाखा एडीसीसी बॅंक येथे मा किसन चव्हाणसर व शेख प्यारेलालभाई यांनी अतिशय महत्वाचे मार्गदर्शनपर भाषणे केली या मोर्चा मध्ये वंचित बहूजन आघाड़ीचे  मा लक्ष्मण मोरे,अन्सारभाई कुरैशी, प्रसाद गरुड़,सागर हवाले,शेख सलीम जिलानी, रविन्द्र निळ, दिलीप वाघमारे,सागर गरूड़, रेश्मा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले मोर्चा एडीसीसी बॅंक येथे आल्यानंतर बॅंकेचे शाखा अधिकारी मा श्रीमंत घुले साहेब व तालुका विकास अधिकारी मा भाऊसाहेब चेके यांनी वयोवृद्ध पेन्शनधारक यांची जाहीर माफी मागीतली व पुन्हा अशा चुका बॅकेच्या कोणत्याही कर्मचार्यांकडून होणार नाही असे सांगितले सर्व वयोवृद्ध पेन्शनधारक  व वंचित बहूजन आघाड़ीच्या कार्यकरत्यांचे व पदाधिकार्यांचे मा ईलाहीभाई कुरैशी यांनी आभार व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News