बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी व युवा आघाडीच्यावतीने सरकारला कंदील भेट आंदोलन


बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी व युवा आघाडीच्यावतीने सरकारला कंदील भेट आंदोलन

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : दौंड : आज (६ जुलै) रोजी दौंड तहसिल कचेरी येथे वाढीव वीज बिल व सक्तीने वसुली करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करून नागरिकांची गळचेपी करणाऱ्या राज्य सरकार आणि विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात सरकारला कंदील भेट आंदोलन करण्यात आले. एकीकडे जनता लॉकडाऊन व कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली आहे, दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे. तरी वीज बिल माफ करण्याऐवजी सरकार वीजपुरवठा खंडित करून शेतकरी, दुकानदार सर्वसामान्य नागरिकांची गळचेपीच करत आहे  याकरिता हे आंदोलन करण्यात आले. 

      या आंदोलनाच्या पुढीलप्रमाणे प्रमुख मागण्या होत्या 

१) दोनशे युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे

२) मीटर भाडे कपात करण्यात यावे.

 ३)विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी.

४) सक्ती ची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी.

५)ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च दोन हजार वीस पासून भरले त्याचे साठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीजबिल निल पाठवावे.

६) ३० दिवसानंतर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

     या प्रसंगी महावितरणचे अधिकारी वैभव पाटिल तसेच दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पालवे तसेच महसुल विभागाचे जाधव साहेब यांना निवेदन देऊन कंदील भेट देण्यात आला. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष बारवकर ता. अध्यक्ष गोरख फुलारी युवा आघाडीचे लखन जाधव, इरफान सय्यद, मनोहर कोकरे महिला आघाडीच्या पुष्पा बनकर, सुनिता आडसुळ, रविना दुर्गूडे, पुनम जाधव, पुजा शिंदे, छाया भोसले, पल्लवी जगताप, रामचंद्र भागवत, सागर भागवत अमोल भोपाळ, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम बहुजन क्रांती मोर्चाचे निलेश बनकर, अशोक मोरे, डॉ. दत्तात्रय जगताप इ. कार्यकर्ते होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News