अ.नगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने प्रा.शिरिष मोडक यांचा सन्मान


अ.नगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने प्रा.शिरिष मोडक यांचा सन्मान

     - जिल्हा वाचनालयाच्यावतीने वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना कार्यवाह विक्रम राठोड. समवेत संचालक किरण आगरवाल, प्रा.ज्योती कुलकर्णी, संजय चोपडा, गणेश अष्टेकर, दिलीप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, अविनाश रसाळ, अरविंद ब्राह्मणे आदि. (छाया : सुरेश मैड) 

ज्ञानदानाचे अखंड कार्य शैक्षणिक चळवळीस प्रेरणादायी     अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -  आपल्या वडिलांकडून आलेला ज्ञानदानाचा ठेवा पुढे चालवत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य अमुल्य असे आहे. ज्ञानदानाचे धडे देतांना हिंद सेवा मंडळ, जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून शकतोत्तर वारसा असणार्‍या संस्थेचे प्रमुख म्हणून केलेले कार्य समाजासमोर आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.

     जिल्हा वाचनालयाच्यावतीने वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी विक्रम राठोड बोलत होते. यावेळी संचालक किरण आगरवाल, प्रा.ज्योती कुलकर्णी, संजय चोपडा, गणेश अष्टेकर, दिलीप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, अविनाश रसाळ, अरविंद ब्राह्मणे उपस्थित होते.यावेळी प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी प्रा.मोडक यांचा सन्मान केला. नगरच्या थोर शिक्षणतज्ञ व समाजसेविकाांनी स्थापन केलेल्या संस्थेचे ज्ञानदानाचे पवित्र काम हे सर्वांच्या सहकार्याने करता आले हे आपले भाग्य असल्याचे प्रा.मोडक यांनी सन्माला उत्तर देतांना सांगितले.


     प्रास्तविक प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी केले, आभार गणेश अष्टेकर यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे नितीन भारताल व कर्मचारी, वाचकप्रेमी उपस्थित होते.
 जाहिरात
Search
विडिओ
Recent News