4 जुलैला "उत्कृष्ट संसदपटू" पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी अण्णांचा आशीर्वादच,राहूल कुल यांनी केली भावनांना वाट मोकळी


4 जुलैला "उत्कृष्ट संसदपटू" पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी अण्णांचा आशीर्वादच,राहूल कुल यांनी केली भावनांना वाट मोकळी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी ---- दौंड तालुक्याचे आमदार राहूल कुल यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कुल यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, मनोगत व्यक्त करताना राहूल कुल म्हणाले "आदर्श संसदपटू" पुरस्काराच्या रूपाने कै. सुभाषआण्णांच्या स्मृतीस श्रद्धांजली !


राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे सन २०१७-१८ चा "आदर्श संसदपटू" पुरस्कार मला जाहीर झाल्याचे तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण मला दि ४ जुलै २०२१ रोजी मिळाले, पत्र पाहून आनंद झाला आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या कारण ४ जुलै म्हणजे माझे वडील, दौंड तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते, कर्मयोगी,आमदार कै. सुभाषआण्णांचा स्मृतिदिन.. आणि गेल्या २० वर्षांचा काळ डोळ्यासमोरून झर्रकन निघून गेला..४ जुलै २००१ रोजी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, नियतीने डाव साधला आणि कै. सुभाषआण्णा आपल्यातून अकाली सोडून गेले त्यांच्या जाण्याने दौंड तालुका पोरका झाला. आम्हा कुल कुटुंबीयांसमोर अनके यक्ष प्रश्न उभे होते ,अनेक संकटे आपल्यासमोर आ वासून उभी होती. ध्यानी मनी नसताना असे अघटित घडले आणि मोठी जवाबदारी अंगावर येऊन पडली, कै. सुभाषआण्णांनी घेतलेलं जनसेवेचे व्रत, संघर्षांचं बाळकडु हा वारसा व प्रेरणा घेऊन समाजकारणाची वाटचाल आपण सुरु ठेवली. २०१४ मध्ये दौंड तालुक्यातील जनतेने मला विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याचवेळी या संधीच सोन करण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प केला, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, युवा सहकाऱ्यांच्या साथीने विकासकामांचा डोंगर उभा केला. संसदीय लोकशाहीची सर्व आयुधे वापरून दौंडचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केला, ८०० पेक्षा जास्त प्रश्न मांडले, शेकडो चर्चांमध्ये सहभाग घेतला, नेहमी सापत्नभाव मिळालेल्या दौंड तालुक्याचा स्वाभिमान, ओळख जपली. 

समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून विकास आणि समाजहित साधत राजकारण या मूलमंत्रासह कै. सुभाषआण्णांच्या विचारांचा वारसा घेऊन, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम व विश्वासाच्या बळावर मी वाटचाल करत आहे, "आदर्श संसदपटू" या पुरस्काराच्या रूपाने कै. सुभाष आण्णांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे असे मी मानतो व ज्यांच्या मुळे मला हे काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.. 

 आपल्या सर्वांच्या स्वप्नातील "सुजलाम सुफलाम" दौंड तालुका घडविणे हेच माझे ध्येयं.. 

 कै. सुभाषआण्णांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन !

जाहिरात
Search
विडिओ
Recent News