कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मागणीला यश,शालार्थ कामासाठी रक्कम गोळा करण्याची पद्धत बंद व्हावी-- गौतम कांबळे


कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मागणीला यश,शालार्थ कामासाठी रक्कम गोळा करण्याची पद्धत बंद व्हावी-- गौतम कांबळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यात शालार्थ प्रणाली प्रशिक्षणाला सुरुवात. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की महाराष्ट्र शासनाने  डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना शालार्थ प्रणालीबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे ही मागणी कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ,जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे 6 जानेवारी 20 21 रोजी करण्यात आली होती .या मागणीचा विचार करून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांचे शालार्थ प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करावे याबाबतचे आदेश मार्च 2021 ला जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले होते .परंतु या आदेशाची अंमलबजावणी वारंवार मागणी करूनही होत नव्हती . दौंड पंचायत समितिचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मुख्याध्यापकांच्या शालार्थ प्रणाली प्रशिक्षणाला सोमवार दिनांक 5 जुलै 2021 पासून सुरुवात करण्यात आली आहे .सर्व मुख्याध्यापकांना ऑफलाइन पद्धतीने कंप्यूटर व लॅपटॉपच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे .यापूर्वी तालुक्‍यात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या .या ऑफलाइन शालार्थ प्रणालीच्या प्रशिक्षणामुळे मुख्याध्यापकांना कामकाज करण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे व यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची लाखो रुपयांची आर्थिक बचत होणार आहे .जिल्ह्यात शालार्थच्या कामासाठी वेगवेगळ्या रक्कमा गोळा करण्याची पद्धत  बंद व्हावी अशी अपेक्षा कास्ट्राईब शिक्षक महासंघाला आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News