दौंड शहरात कोरोना नियम मोडणाऱ्या वर दौंड पोलिसांची कारवाई, नियमांचे पालन करा-- पो नि नारायण पवार


दौंड शहरात कोरोना नियम मोडणाऱ्या वर दौंड पोलिसांची कारवाई, नियमांचे पालन करा-- पो नि नारायण पवार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :


दौंड शहर आणि परिसरात कोरोना महामारी विषयी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे,त्यामुळे दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दौंड शहरांमध्ये लोक डाऊन च्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा सोडून विनापरवाना दुकाने उघडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, त्या कारवाईमध्ये Asi महेंद्र गायकवाड Asi जाधव पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड हवलदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणे तसेच सरपंच वस्ती परिसरातील 11 दुकानावर कारवाई केली आहे त्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये दंड केला आहे,तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा आम्हालाही कारवाई करण्याची हौस नाही,परंतू परिस्थिती नुसार कारवाई करावी लागते, आम्हला कठोर वागण्यास लावू नये,त्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यावेळी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News