श्रीगोंद्यात प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप....


श्रीगोंद्यात प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप....

ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त महीला रुग्णांना साड्यांचे वाटप..

श्रीगोंदा  अंकुश तुपे प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात ना.बच्चू कडू यांचा वाढदिवस श्रीगोंदा प्रहार संघटनेचे तालुका प्रमूख सुरेश सुपेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयातील महीला रुग्णांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितिन खामकर तसेच डॉ. संघर्ष राजुळे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करून साजरा केला. तसेच प्रहार संघटनेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे, शहराध्यक्ष माधव बनसोडे, माजी तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर, विजय शेंडगे, साहेबराव रासकर यांच्या सह प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News