मुस्लिमांना आरक्षण द्या शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा


मुस्लिमांना आरक्षण द्या शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून यासाठी मुस्लिम समाजाची अनेक दिवसांपासून मागणी आहे, परंतु मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत असल्यामुळे, आज विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी वंचित चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, त्या मोर्चाला पाठिंबा म्हणून आज शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी चे राज्याचे उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते, यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देत मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली,

    यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्रा किसान चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी वंचित चे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, रवींद्र निळ, शेख सलीम जिलानी, दिलीप वाघमारे,सागर गरुड,धोंडीराम मासाळकर, विशाल इंगळे,शेख बंन्नुभाई,सागर हवाले, फारूकभाई इनामदार,  ईलाहीभाई कुरैशी,शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे तसेच तृतीय पंथी शेवगांव तालुका अध्यक्ष रेशमा गायकवाड,जब्बारभाई पठाण, शेख खैरद्दीन,रशीदभाई शेख मुबीन तांबोळी *जमाते उलेमाचे मौलाना आबेद हाफीजसहाब* यांनी ही *जमाते उलेमा तर्फे निवेदन देण्यात आले* या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मा प्रकाश बापू भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी सकल मुस्लीम बांधव तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते व पदाधिकारी  उपस्थित होते,

      यावेळी तहसील कार्यालयावर गेल्यानंतर प्राध्यापक किसन चव्हाण सर यांनी सरकारच्या मुस्लिम विरोधी आरक्षणाच्या धोरणांवर टीका केली, निवेदन शेवगांव निवासी नायब तहसीलदार  काथवटे यांना देण्यात आले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News