श्रीगोंद्यातील दक्ष भाईजान


श्रीगोंद्यातील दक्ष भाईजान

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी , दिड वर्षापासुन घरातुन बेपत्ता झालेली एक महिला श्रीगोंदा येथे अत्यवस्थ अवस्थेत आढळुन आली होती. तिच्यावर शासकिय दवाखान्यात उपचार करण्यात आले. चार पाच दिवसानंतर तिची मानसिक स्थिती सुधारल्यानंतर तिच्या बरोबर चर्चा केल्यावर तिच्या नवर्याचा नंबर समजला. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यावर दक्षने तिला तिच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला.

     एका गणेशच्या राजराणीला घरी सोडण्यासाठी सोशल मिडीयावर माहिती टाकली व मदतीची याचना केली. पहात पहाता मदतीचा ओघ सुरु झाला. कोणी तिकीट काढुन दिले तर कोणी देता येईल ते सहकार्य दिले.

    तिच्या घरची व परिसरातील कोणत्याही प्रकारची माहिती नसताना मोठे धाडस दाखवत दक्षची टिमने हे आव्हान स्विकारत सहजपणे शिवधनुष्य पेलले. 

     ३ तारखेला शेवटी ती राजराणी दिदीला घेऊन दक्षचे दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे उत्तर प्रदेशातील उतरौला स्थित तिच्या घरी निघाले होते. आणि आज ५ तारखेला उतरौला येथे पोलीस निरिक्षक पंकज सिंग यांच्या समक्ष तिचा पती गणेश च्या हवाली करण्यात आले. यावेळी तिची८ वर्षाची मुलगी सिमा भांबावुन गेलेली दिसली. दत्ताजींनी तिला उचलुन घेऊन धीर दिला. त्यावेळेस ती म्हणाली,  "वही मेरे अम्माको साथ में लानेवाले मामा हो ना? आप मेरे लिए ड्रेस लाने वाले थे । ड्रेस लाया है? मुझे मेरी अम्मा मिली।" यावेळी सर्व वातावरण भारावलेले होते. दिदी गणेशच्या गळ्यात पडुन मोठमोठ्याने हंबरडा फोडत रडत होती. आजुबाजुचे पहाणारे लोक व स्थानिक संघाचे व विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते सुध्दा भावुक झाले होते.

      सर्व सोपस्कर पार पाडल्यानंतर दत्ताजी व नारायण हे तिला तिच्या राहत्या घरी सोडुन आले. आमचे प्रतिनिधी दत्ताजींबरोबर संपर्क केल्यानंतर ते सुध्दा खुप भावुक झालेले जाणवले.

       अशा प्रकारे एक सामाजिक संस्था इतके मोठे काम सहजपणे पार पाडते हे श्रीगोंद्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुध्दा प्राप्त परिस्थितीशी झुंजत समाजउपयोगी काम करत आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यास एक वेगळा आधार निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News