पर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान


पर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी  मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी पै. नाना डोंगरे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात झाडे लाऊन कन्यादान केले. नवदाम्पत्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतलेल्या डोंगरे यांनी गावात तब्बल दीड हजार पेक्षा झाडे लाऊन ती जगवली आहेत. मुलीच्या लग्नात वर्‍हाडी मंडळींसह वृक्षरोपण करुन मुलीच्या संसारासह निसर्ग देखील बहरण्यास हातभार लावला. 

आमदार निलेश लंके यांनी लग्नास हजेरी लाऊन वधू-वरांना आशिर्वाद दिले. यावेळी आमदार लंके यांच्या उपस्थितीत प्रियंका डोंगरे व अक्षय ठाणगे या नवदाम्पत्यांनी झाडे लाऊन आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. गावातील न्यू मिलन मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी वन परीक्षेत्र अधिकारी दिलीप जिरे, वनरक्षक अफ्सर पठाण, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दैठण गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ, उप महाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, अनिल डोंगरे, भागचंद जाधव, सुरेश खामकर, भाऊसाहेब ठाणगे, जालिंदर बोरुडे, बाळू भापकर, उद्योजक दिलावर शेख, डॉ. विजय जाधव, संतोष कदम, अतुल फलके, संदीप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, नयन ठाणगे, गणेश येणारे, दादा डोंगरे, एकनाथ डोंगरे, राजू शिंदे, अक्षय पवार आदी उपस्थित होते.जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळाले. ऑक्सिजन एकमेव स्त्रोत झाडे असून, पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याने पै. नाना डोंगरे गावाच्या पंचक्रोशीत वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. डोंगरे संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी ते योगदान देत आहे. जन्म, वाढदिवस, विवाह, मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच सण, उत्सव काळात वृक्षरोपण करुन ही चळवळ व्यापक होण्याच्या उद्देशाने त्यांचा नेहमीच पुढाकार सुरु आहे. त्यांच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करुन मुलीच्या लग्नात राबवलेला वृक्षरोपण अभियान प्रेरणादायी असल्याचे सांगितले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News