त्या आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा रिपाइं (आठवले ) चा राहुरी तहसीलवर मोर्चा


त्या आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा रिपाइं (आठवले ) चा राहुरी तहसीलवर मोर्चा

राहुरी फॅक्टरी विजय भोसले, प्रतिनिधी :


            बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य  केल्याने सदर आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा राहुरी तालुक्यातील खडांबे येथील अॅक्ट्रासिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तात्काळ अटक करावी तसेच राहता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावी आदि मागणीसाठी राहुरी तहसीलवर रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडीया (आठवले) च्या वतीने उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांचे नेतृत्वाखाली  मोर्चा काढण्यात आला होता.

खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या तरुण दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.सदर प्रकार अंत्यंत गंभीर असुनदेखील तेथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथवणीखोर वक्तव्य करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा मोर्चा आरपीआय च्या वतीने  या आमदारांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यावरावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येथील असा इशारा देखील  आंदोलन करत्यांनी दिला आला आहे.

     याप्रसंगी आंदोलन कर्तांनी आपल्या मागण्याचे निवेदन डिवायएसपी संदिप मिटके,तहसीलदार फसियोद्दीय शेख,पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे दिले.याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,तालुका अध्यक्ष,विलास साळवे, बाळासाहेब जाधव विजय वाकचौरे ,श्रावण वाघमारे, सिमा बोरूडे,स्नेहल सगळगिळे,रमेश गायकवाड,गोविंद दिवे,सचिन साळवे,,दत्ताञय भोसले आदींसह भिमसैनिक उपस्थित होते.


*ख-या ला खरे म्हणा ; सुरेंद्र थोरात*

      सदर मोर्चामध्ये राहुरी तालुक्यातील खडांबे येथील आरोपी यांना देखील तात्काळ अटक करावी अशी मागणी आरपीआयच्या वतीने या मोर्चात करण्यात आली आहे.त्यामुळे आमच्या आंदोलनाला त्यांनी देखील पाठिंबा देऊन या ठिकाणी येणे गरजेचे होते. मात्र खर्‍याला खरं म्हणा असे आवाहन देखील यावेळी सुरेंद्र थोरात यांनी संबंधितांना केले आहे.त्यामुळे पोलिसांवर आरोप करणा-या काही व्यक्तीं खडांबे प्रकरणात काय साध्य करू पहात आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

आमदार गायकवाड यांचेवर कडक कारवाई करावी - विलास नाना साळवे

आमदार संजय गायकवाड यांचे विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपाइं आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेईल जोवर आमदार गायकवाड यांचेवर कारवाई होत नाही तोवर रिपाइं कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे  यांनी दिला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News