जनमोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भिंगारे


जनमोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भिंगारे

ओबीसी , व्ही जे एन टी जनमोर्चाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्ते सुनील भिंगारे यांची नियुक्ती करून त्यांना   तसे पत्र देतांना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, समवेत शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे,डॉ.सुदर्शन गोरे,अनुरिता झगडे, आदी.(छाया : देवीप्रसाद अय्यंगार)

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) : ओ बी सी,  व्ही जे एन टी जनमोर्चाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील तमन्ना भिंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी भिंगारे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी  संघटनेचे शहरजिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदि उपस्थित हौते.,संघटनेच्या माध्यमातून दक्षिण जिल्ह्यातील असंघटित व संघटित ओबीसी व्ही जे एन टी समाज बांधवांना एकत्र करून प्रथम त्यांचे संघटन मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करू असे श्री भिंगारे यांनी नियुक्ती पत्र स्वीकारतांना आश्वासन दिले. 

ओबीसी व्ही जे एन टी या समाजाचे प्रश्न विशेषतः समाजातील लोकांचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून समाजाची सध्यस्थिती, त्यावरील उपाय यावरील भाष्य करणारी विचारवंतांची व्याख्याने, चिंतन शिबीर आदी उपक्रम  दक्षिण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आयोजित करणार असल्याचे भिंगारे यांनी सांगितले. श्री भिंगारे हे विद्यार्थीदशे पासूनच सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते न्यू आर्टस् महाविद्यालयात १९८५ साली " जी एस" म्हणून बहुमताने निवडून आले होते. सन १९९०-९५  ते नगर पालिकेत नगरसेवक म्हणूंन कार्यरत होते.


महाराष्ट्र राज्य कशी कापडी समाजाचे भिंगारे हे उपाध्यक्ष असून समाजाच्या जिल्हा ट्रस्टचे ते अध्यक्ष आणि जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष आहेत.गेल्या ३५ वर्षात त्यांनी विविध संस्था संघटनेत पदे भूषविली असून त्यांच्यातील सामाजिक जाणीवेमुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला आहे.       


१९७८-८५ या दरम्यान काँग्रेसच्या जिल्हा समितीत अग्रेसर असणारे कै.अण्णा भिंगारे यांचे ते पुतणे असून राजकीय,सामाजिक कार्याचा वसा त्यांना त्यांच्या काकांकडूनच मिळाला आहे. त्यांनी हि परंपरा आजही जपली आहे. या निवडीबद्दल भिंगारे यांचे डॉ.सुदर्शन गोरे,बाळासाहेब साळवे,भानुदास सोनावणे, सतीश चौधरी, विजय वाडेकर,पिंटू भिंगारे,नितीन भिंगारे,दिनेश भिंगारे,राजू भिंगारे,रमेश सानप,, अनुरिता झगडे आदींनी अभिनंदन केले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News