गोहे बुद्रुक येथील खून प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल. विलास काळे


गोहे बुद्रुक येथील खून प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल.  विलास काळे

घोडेगाव प्रतिनिधी:   गोहे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील कैलास उर्फ बाबु दशरथ गेंगजे यांच्या खून प्रकरणी तीन जण व इतर अनोळखी चार जणांविरूध्द घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

     याबाबत घोडेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २७ जुन रोजी पुणे येथील कंपनीतून सुटल्यानंतर कैलास गेंगजे मोटार सायकलवरून गोहे बु. येथील संगमवाडी येथे आला. सायंकाळी सहाचे दरम्यान वसंत उभे यांचे नविन घराचे बांधकामावर कैलास गेंगजे मित्रांबरोबर गप्पा मारत असताना रात्री आठचे सुमारास ओंकार अनिल घोलप, सुरज घोलप, अनिकेत घोलप (सर्व रा. डिंभे, ता. आंबेगाव) व इतर तोंड बांधलेले चार व्यक्ति यांनी कैलासला बोलावुन ओंकार याने त्यांच्या जवळ असणा-या कोयत्याने कैलासच्या डोक्यात, डावे गुडघ्याचे बाजुला, उजवे गुडघ्याचे खाली, डावे कानाचे वरती, डावे मांडीवर कोयत्याने मारले. सुरज व अनिकेत यांनी त्यांचे हातातील रॉडने माझे डावे हाताचे पोटरीवर, पाठीवर, डावे पायाचे नडगीवर मारल्याने नडगी तुटली तर इतर चार अनोळखी व्यक्तिंनीही त्यांचे जवळील लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करत असताना गळयातील चैन व खिशातील पैसे गहाळ झाले. जखमी अवस्थेत कैलास यांस प्रथम ग्रामीण रूग्णालय घोडेगाव व पुढील उपचारांसाठी वाय. सी. एम रूग्णालय पुणे येथे दाखल करण्यात आले.

   उपचारांदरम्यान कैलास गेंगजे (वय- २५) याचा मृत्यु झाला. त्यामुळे मारहाण केल्याप्रकरणी ओंकार घोलप, सुरज घोलप, अनिकेत घोलप व इतर चार व्यक्तिंविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News