पाटसमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांची निर्घृण हत्या,आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना,परिस्थिती नियंत्रणात -- DYSP राहूल धस


पाटसमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांची निर्घृण हत्या,आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना,परिस्थिती नियंत्रणात -- DYSP राहूल धस

 विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या पाटस गावच्या हद्दीतील तामखडा येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून  दोघा जणांचा निर्घृण खून करण्यात आला असून घटनेतील आरोपी पसार झाले आहेत.परंतू परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली  असून कोणीही अफवा पसरवू नये, घाबरून जाऊ नये,आरोपींच्या अटके साठी तीन पथक तयार करून रवाना केली असल्याचे दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक राहूल धस यांनी सांगितले आहे,

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवम संतोष शितकल (वय 23) व गणेश रमेश माखर (वय 23, दोघे रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड, पुणे) या दोन तरुणांचा दुपारच्या सुमारास तामखडा येथे काही जणांबरोबर वाद झाला होता. त्यानंतर वातावरण शांत झाले आहे असे वाटत असतानाच रात्री 10च्या सुमारास हे दोन तरुण पुन्हा तामखड्यात आले. यावेळी फोनवरून शिव्या का दिल्या याचा जाब आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले (दोघे रा. तामखडा, पाटस), योगेश शिंदे (रा. गिरीम, ता. दौंड) व इतर अनोळखी पाच-सहाजण यांना विचारला असता या दोघांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले व नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. याबाबत अर्जुन संभाजी माखर (वय 19) याने फिर्याद दिल्याने आरोपींविरुद्ध भा द वि कलम 302,141,146,147,148,149,504,506,शस्र अधिनियम 4/25 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटसचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तरुणांचे मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी तीन पथक तयार केले असून पथक रवाना केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राहूल धस यांनी सांगितले, आरोपी लवकरच अटक करण्यात येतील, पाटस येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे,तरी पाटसच्या ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये,आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक राहूल धस यांनी पाटसच्या ग्रामस्थांना केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News