शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कंपनीच्या विरोधात कोर्टात मला जावे लागले तरी चालेल शेतक-यां समवेत आंदोलन करणार :- मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कंपनीच्या विरोधात कोर्टात मला जावे लागले तरी चालेल शेतक-यां समवेत आंदोलन करणार :-   मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

     शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कंपनीच्या विरोधात मला कोर्टात जावे लागले तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माघे  हटणार नाही कंपनी विरोधात शेतक-यां समवेत आंदोलन करणार असल्याचा इशारा मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.

         रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कंपनीनां सरकार व सुप्रीम कोर्टाने लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी ह्या कंपन्यांना परवानगी दिलेली नसून लोकांना रोजगार देण्यासाठी ही परवानगी दिली असताना मात्र ही कंपनी जाणीवपूर्वक लोकांचे जीवन उद्वस्थ करण्याच्याच मागे लागली आहे.रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कंपनीतून वाहणाऱ्या दुषित पाण्याची पाहणी करताना मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपण लवकरच उद्योग मंत्री सुभाष देसाई व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड कंपनीला वाढीव क्षेत्र देऊ नये अशी मागणी करणार असल्याचे म्हटलं तर औद्योगिक वसाहतीतून होणारे प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही कंपनीचे पाणी ओढ्या- नाल्यांमधून वाहत असल्याचे मान्य केले असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

               याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,शिरूर- आंबेगाव बेटमंडलचे भाजपा अध्यक्ष सतीश पाचंगे, lपंचायत समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे , शिरूर -आंबेगाव शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश जामदार,निमगाव भोगी गावचे सरपंच सचिन सांबारे,आण्णापुरचे सरपंच दत्तात्रय कुरुंदळे,माजी सरपंच अंकुश इचके,संजय पावशे,उत्तम व्यवहारे,लक्ष्मण सांबारे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांच्या उपस्थितीत निमगाव भोगी गावचे सुमारे सहाशे एकर क्षेत्र नापीक झाले असल्याने व कंपनीचे पाणी शेतामध्ये येऊ न देणे , आज पर्यंत जे शेतीचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई देणे व वाढीव क्षेत्र न देणे आदी मागण्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सचिन सांबारे यांनी यावेळी केली.

      शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन जुन्नर चे माजी आमदार व जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माघे हटणार नाही कंपनी विरोधात शेतक-यां समवेत आंदोलन करणार असल्याचा इशारा मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News