पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकाप्रमुख निवडणार टेनिस क्रिकेट असोसिएशन : प्रविण होले


पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकाप्रमुख निवडणार टेनिस क्रिकेट असोसिएशन :  प्रविण होले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :जिल्हा क्रिकेट असोसिएशन ही टेनिस क्रिकेट असोसिएशन राज्य व राष्ट्रीय टेनिस क्रिकेट संघटनेशी संलग्न असून पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना संघटनेच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे, यासाठी लवकरात लवकर तालुकानिहाय पदाधिकारी निवडण्यात येणार येणार  असल्याची माहिती टेनिस क्रिकेट संघटनेचे जिल्हा सचिव श्री प्रविण होले यांनी दिली.


 पुणे जिल्ह्यातील फक्त शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील संघटनेच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या स्पर्धासाठी  मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असोसिएशन करणार असल्याचे मत संघटनेचे सचिव व प्रशिक्षक प्रविण होले  यांनी व्यक्त केले, यासाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या राज्य सचिव  मिनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनानुसार,

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका प्रमुख म्हणून कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, क्रिकेट क्लब मेम्बर्स, यांनी 9890 867609/7249700911 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रविण होले केले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News