लोणी पाटी येथे ओबीसी समाजाची बैठक संपन्न, ओबीसीच्या आरक्षण लढ्यासाठी बारामती मधून एल्गार...


लोणी पाटी येथे ओबीसी समाजाची बैठक संपन्न, ओबीसीच्या आरक्षण लढ्यासाठी बारामती मधून एल्गार...

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) ओबीसीचे अतिरिक्त आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यानंतर देशात आणि राज्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हक्काचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व जाती धर्मातून प्रचंड चीड निर्माण होत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यात एल्गार महामोर्चा चे आयोजन करण्यात येण्यार आहे. याची तयारी करण्यासाठी ओबीसीचे अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक यांची बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील गंगोत्री लॉन येथे बैठक पार पडली.

 या बैठकीत ओबीसीच्या अनेक मागण्या आणि त्यावर पाठपुरावा कसा करावा एल्गार महामोर्चाचे नियोजन कसे करावे याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी हे ओबीसी एल्गार महामोर्चा हा राजकीय पक्ष विरहीत असावा यावर एकमत करून तशा पद्धतीने पुढची दिशा ठरवण्यात आली.

      या बैठकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, पांडुरंग मेरगळ, ऍड.जी.बी.गावडे, अहिल्या सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील, सुरेशभाऊ कांबळे, किशोर मासाळ, गणपतराव देवकाते, ज्ञानेश्वर कौले, ज्योती झुरंगे, संपतराव टकले, बापुराव सोलनकर, मुरलीधर ठोंबरे, प्रितेश गवळी, मच्छिंद्र टिंगरे, माणिक काळे, संजय कुंभार, पोपट धवडे, दत्ता लोणकर, विविध गावचे सरपंच, पदाधिकारी तसेच ओबीसी समाजातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News